IPL 2025 Ashwani Kumar MI vs KKR: वानखेडेवर अश्वनी कुमारचं नाव गाजलं; पदार्पणाच्या सामन्यात इतिहास रचला, पहिला भारतीय खेळाडू ठरला
IPL 2025 Ashwani Kumar MI vs KKR: मुंबई इंडियन्सकडून डावखुरा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले.

IPL 2025 Ashwani Kumar MI vs KKR: आयपीएल 2025 च्या हंगामात (IPL 2025) काल (31 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians Vs Kolkata Knight Riders) यांच्यात सामना खेळवण्यात आला. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 8 विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताला पराभूत करुन मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला विजय मिळवला आहे.
मुंबई इंडियन्सकडून डावखुरा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारने (Ashwani Kumar) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. या पदार्पणाच्या सामन्यातच अश्वनी कुमारने मुंबई इंडियन्सकडून खेळताना इतिहास रचला आहे. या सामन्यात चार महत्वाच्या विकेट्स घेत अश्वनी कुमारने सर्वांचं लक्ष वेधलं. तसेच 23 वर्षीय अश्वनी आयपीएल पदार्पणात चार विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
Debut straight out of a storybook 📖
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2025
The perfect first chapter for Ashwani Kumar 👌👌
Updates ▶ https://t.co/iEwchzDRNM#TATAIPL | #MIvKKR | @mipaltan pic.twitter.com/npaynbIViX
अश्वनी कुमारने इतिहास रचला-
23 वर्षीय अश्वनी आयपीएल पदार्पणात चार विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अश्वनी कुमारने अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, मनीष पांडे आणि आंद्रे रसेल यांना बाद केले. अश्वनी कुमारच्या भेदक गोलंदाजीपुढे कोलकाताचा संघ अवघ्या 116 धावा करु शकला. अश्वनी कुमारने पहिल्याच चेंडूवर रहाणेला बाद केले. आयपीएल पदार्पणात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा अश्वनी कुमार अली मुर्तझा आणि अल्झारी जोसेफ यांच्यानंतर मुंबईचा तिसरा खेळाडू ठरला.
अश्वनी कुमारने सर्वांना केले प्रभावित-
अश्वनी कुमारने त्याच्या पहिल्याच आयपीएल सामन्यात शानदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. भविष्यात अश्वनी कुमार मुंबईसाठी एक महत्त्वाचा खेळाडू बनू शकतो हे त्याने दाखवून दिले आहे. अश्वनी कुमारचा संघर्ष देखील अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. कठोर परिश्रम आणि समर्पणाने काहीही साध्य करता येते हे अश्वनी कुमारने सिद्ध केले आहे.
सामना कसा राहिला?
एकतर्फी झालेल्या सामन्यात सहज बाजी मारत मुंबईने आपल्या गुणांचे खाते उघडताना गतविजेत्या कोलकाताचा 8 विकेट्सने धुव्वा उडविला. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या मुंबईने कोलकाताला 16.2 षटकांत 166 धावांत गुंडाळले. यानंतर केवळ 12.5 षटकांत 2 बाद 121 धावा करत मुंबईने दिमाखात बाजी मारली. आयपीएल पदार्पणात 4 बळी घेणारा अश्वनी कुमार सामनावीर ठरला.





















