एक्स्प्लोर

Suresh Dhas Beed Crime: खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखला होता, राजस्थानातून मारेकरी आले होते; सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

Suresh Dhas: सुरेश धस यांचा खळबळजनक दावा, आपल्याला मारायला राजस्थानातून बिश्नोई गँगची माणसं विमानाने मुंबईला आणण्यात आली होती. मी हरणाचं मांस खातो, असे त्यांना सांगितले.

बीड: सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखण्यात आला होता, असा खळबळजनक दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सतीश भोसले (Satish Bhosale) हरणांना मारुन त्याचे मांस हे सुरेश धस (Suresh Dhas) यांना पुरवतो, असे सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. या लोकांना मला मारण्यासाठी आणले होते, असे सुरेश धस यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. सुरेश धस यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण उचलून धरत जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्टाचं राजकारण तापवलं होतं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंसह भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही टीकेची तोफ डागली होती. पण तेच सुरेश धस त्यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्यामुळे चांगलेच बॅकफूटला गेले होते. याच 'खोक्या'वरुन आता सुरेश धसांनी आता पुन्हा एकदा बाजी पलटवताना गंभीर आरोप केला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात विमानाची तिकीटं फाडून राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोकं थेट मुंबईत आणण्यात आली. त्यांना खोक्यानं सुरेश धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत सांगितलं. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखत दिली. यावेळी त्यांनी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या बॅटनं अमानुष मारहाण, उधळलेल्या नोटा, हरणाच्या शिकारी यांवरुन होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देतानाच सर्वात मोठा धक्कादायक खुलासा केला आहे.

खोक्या सोन्याचे नव्हे बेन्टेक्सचे दागिने घालून फिरायचा: सुरेश धस


खोक्या जो वाळू कॉन्ट्रक्टर आहे, वनविभागाच्या जागेत राहत होता, बेनटेक्सचे दागिने घालून फिरत होता. तसेच मुथुट फायनान्समधून आणलेले पैसे उधळत होता. त्याची 4 ते 5 लाखांचीही प्रॉपर्टी नसेल, हाच तो खोक्या जो टीव्हीवर दाखवण्यात आला. त्याच्या घरात वाघार बिघारचं मांस सापडलं असेल. पण तेच वनविभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांनी उचलून नेलं. आता पारध्याच्या घरात थोडंच पंचांग वगैरे सापडणार आहे का, अशी मिश्किल टिप्पणीही आमदार धस यांनी यावेळी केली.

परळीचे मुंडे माझ्या मतदारसंघात आले आणि म्हणाले, सुरेश धसला खोक्यानं हरणाचं मांस पुरवलं. माझ्यावर एवढी वाईट पाळी आली का, माझ्या आयुष्यात 16 वर्षे मी माळकरी राहिलेला माणूस आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे मी करतो. पण माझ्या आयुष्यात हरणाच्या मांसापर्यंत कधीच गेलो नाही. मी पशू-पक्ष्यांवर प्रेम करणारा माणूस आहे. मला काय माहिती त्यांच्या घरात काय सापडलं, असं म्हणत धस यांनी विरोधकांचा खोक्यानं मांस पुरवल्याचा दावाही फेटाळून लावला.

माझ्या मतदारसंघात असं स्टेटमेंट येऊन एकानं करायचं आणि दुसऱ्याने मुंबईत विमानाची तिकीटं फाडून मुंबईत बिश्नोई समाजाची चार दोन माणसं आणायची. बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन करायचं. तो लॉरेन्स बिश्नोई. त्यांच्या समाजात हरणाला मंदिराचा दर्जा आहे. तिथपर्यंत असं नेऊन ठेवायचं की, सुरेश धस हरणाचं मांस खातो. म्हणजे काय तुमची मानसिकता आहे, असंही त्यांनी आरोप विरोधकांवर केला. म्हणजे लॉरेन्स बिश्नोईनं माझा खून केला पाहिजे. इतक्या खालच्या स्तराला जर तुम्ही जात असाल तर तुमच्याबरोबर दोस्ती काय कामायची. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण सांगणार आहोत. इतक्या दिवस आपण हे कधी बोललो नव्हतो. बिश्नोई समाजाची तीन-चार लोकं विमानाची तिकीटं फाडून जर मुंबईत आणात असाल, आणि त्यांना जर खोक्याविषयी सांगून मला जीवनातून उठवण्यापर्यंत तुम्ही गेले ना. यापाठीमागं कोण कोण लोकं आहेत हे मला माहीत असल्याचंही धस यावेळी म्हणाले. शिरुर कासारमध्ये बाहेरुन लोकं आणून मोर्चा काढण्यात आला. तो मोर्चाही अगदी 250 लोकांचा होता. या दोनशे अडीचशेच्या मोर्चानं काही होणार. काही झालं की शिरुर बंद काहीही झालं की शिरुर बंद. ते जे शिरुरमध्ये राहणारे लोकं पळून चाललेत ना, असा टोलाही सुरेश धस यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

आणखी वाचा

माणसं सोडा पण सतीश भोसलेने प्राण्यांनाही सोडलं नाही; हरीण, ससे, मोर अन् शेकडो काळवीटं शिजवून खाल्ली

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Nagpur Buffalo Attack : कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
Ulhasnagar Crime: ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
Embed widget