Suraj Chavan Upcoming Movie Zapuk Zupuk: टॉपचा किंग आलाय पिक्चर मधल्या सगळ्यांना घेऊन; सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'चं नवं पोस्टर रिलीज
Suraj Chavan Upcoming Movie Zapuk Zupuk: दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणच्या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच, या चित्रपटात सूरजसोबतच दमदार स्टारकास्टही झळकणार आहे.

Suraj Chavan Upcoming Movie Zapuk Zupuk: सोशल मीडिया स्टार (Social Media Star) आणि 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सूरज चव्हाणच्या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच, या चित्रपटात सूरजसोबतच दमदार स्टारकास्टही झळकणार आहे.
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्मात्या ज्योती देशपांडे, निर्मात्या बेला केदार शिंदे , केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. दमदार टीझर आणि पोस्टरनंतर आता सूरज चव्हाणच्या आगामी चित्रपटाचं आणखी एक नवं धमाकेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
सूरज चव्हाणसोबत चित्रपटात तगडी स्टारकास्ट
फॅमिली एंटरटेनमेंटचा जबरदस्त तडका असलेल्या 'झापुक झुपूक' या चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरे पहायला मिळत आहेत. केंदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' चित्रपटात सूरज चव्हाणसह लोकप्रिय इतर कलाकार कल्ला करताना दिसणार आहेत. यामध्ये 'पिरतीचा वनवा उरली पेटला' मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, 'अबीर गुलाल' मालिकेतील पायल जाधव, 'तुमची मुलगी काय करते' मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
पोस्टरमध्ये आपण पाहू शकतो, सूरज बैलगाडी ओढत आहे, तर त्याच बैलगाडीवर बाकी सर्व कलाकार स्वार आहेत. सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावर हसू आहे, ज्यामुळे नक्की चित्रपटाची कहाणी काय असणार आहे? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे उत्तम युवा अभिनेत्यांमुळे हा चित्रपट नक्कीच सध्याची युवा पिढी आणि सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरणार आहे. इतकंच नव्हे तर गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीच्या शोभायात्रेत सूरज चव्हाण सहभागी झाला होता. यावेळी त्यानं आपला हटके अंदाज आणि डान्सनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. एकंदरीतच हे सर्व कलाकार मोठ्या पद्यावर धमाल करणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील धमाल मस्ती प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान, जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' सिनेमा जवळच्या चित्रपटगृहात, 25 एप्रिल पासून प्रदर्शित होणार आहे.
























