एक्स्प्लोर

तीव्र तापमानामुळे वैदर्भीय विद्यार्थ्यांना काही झालं तर शिक्षण विभाग जबाबदारी घेणार का? राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा संतप्त सवाल

Temperature in Vidarbha : राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाच दिवशी, एकाच वेळेस परीक्षा घेण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाहून विदर्भातील शाळा व्यवस्थापनांमध्ये तीव्र नाराजी आहे

Exams in Vidarbha : विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता पाहता आजवर सर्व शाळांच्या सर्व परीक्षा (लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक) 23 एप्रिलपर्यंत होऊन त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असायची. मात्र नुकतच राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाच दिवशी, एकाच वेळेस परीक्षा घेण्याचा निर्णय घेत संपूर्ण राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या परीक्षा 23 एप्रिलपर्यंत, आणि प्राथमिक शाळांच्या परीक्षा 25 एप्रिल पर्यंत घेण्यास सांगितले आहे. त्यानंतर तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायची आहे. त्यामुळे 25 एप्रिलपर्यंत लेखी परीक्षा व त्यानंतर तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा आणि त्यानंतर पेपर तपासणी करून निकाल लावेपर्यंत किमान 15 मे उजाडणार आहे. विदर्भातील सर्व शाळा व्यवस्थापनांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जर शिक्षण विभागाच्या नव्या आदेशाप्रमाणे विदर्भातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा 25 एप्रिलपर्यंत चालतील आणि त्यानंतर तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांना तीव्र उन्हात, जास्त तापमानाचा सामना करत मे महिन्यापर्यंत शाळेत यावे लागेल. तसेच निकाल लागता लागता 15 मे उजाडेल. त्यामुळे शिक्षण विभागाने एकाच दिवशी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्याचा अट्टाहास सोडावं आणि विदर्भात पूर्वी ज्या पद्धतीने 23 एप्रिलच्या आधीच सर्व परीक्षा (लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक) पूर्ण व्हायच्या, तशीच प्रक्रिया सुरू राहू द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे.

तर हेकेखोर अधिकाऱ्यांना मे महिन्यात विदर्भात पाठवा 

दरम्यान, या मागणीसाठी महामंडळाने या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्रही पाठवले आहे. राज्य सरकार जर विदर्भातील शाळा व्यवस्थापनांची ही मागणी मान्य करणार नसेल तर शिक्षण विभागाच्या हेकेखोर अधिकाऱ्यांना मे महिन्यात विदर्भात शाळांची तपासणी करण्यासाठी पाठवावं, म्हणजे त्यांना विदर्भातील तीव्र उन्हाचा अंदाज येईल, अशी मागणी ही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे.

एप्रिल ते जून या काळात उष्णतेची लाट

IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. या दोन्ही भागात तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून या काळात उत्तर आणि पूर्व भारत, मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात उष्णतेची लाट सामान्यपेक्षा दोन ते चार दिवस जास्त राहण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुमचे केस पांढरे होतील पण तुम्ही इथं बसू शकणार नाहीत, पंतप्रधानांच्या खुर्चीकडे बोट दाखवत अमित शाहांचा राहुल गांधींना टोला
तुमचे केस पांढरे होतील पण तुम्ही इथं बसू शकणार नाहीत, पंतप्रधानांच्या खुर्चीकडे बोट दाखवत अमित शाहांचा राहुल गांधींना टोला
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
GT vs KKR Live Update : जेव्हा सर्व आशा संपल्या, तेव्हा तो एकटाच लढला! कोलकात्याचा खरा 'संकटमोचक' कॅमरून ग्रीन, संपूर्ण 'गेम'च पलटला
GT vs KKR Live Score IPL 2026 : जेव्हा सर्व आशा संपल्या, तेव्हा तो एकटाच लढला! कोलकात्याचा खरा 'संकटमोचक' कॅमरून ग्रीन, संपूर्ण 'गेम'च पलटला
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Gold : 2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले,अक्षय तृतीयेपूर्वी सोन्यात चढ-उतार; पुढे काय होणार, मोतिलाल ओसवालचा अहवाल काय सांगतो?
2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले, पुढं काय होणार,मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा अहवाल काय सांगतो?
Embed widget