Horoscope Today 01 April 2025: आज एप्रिलचा पहिला दिवस 'या'4 राशींसाठी खास! मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा..
Horoscope Today 01 April 2025: आज एप्रिलचा पहिला दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 01 April 2025: पंचांगानुसार, आज 01 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार मंगळवार. आज एप्रिल महिन्याचा खास दिवस आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो कोर्ट कचेरीची कामे लांबतील, शेजारची अतिसलगी किंवा वाद टाळावेत.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज भावंडांची मतभेद संभवतात, घशासंबंधी आजार होतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज प्रवासामध्ये सर्व प्रकारची काळजी घेणे आवश्यक ठरेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज कोणत्याही कामात अति धाडसीपणा टाळावा, वेळेच्या बाबतीत काटेकोर राहाल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज तुमची अति शिस्तबद्धता इतरांना त्रासदायक ठरू शकते, याचाही विचार करावा लागेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज घरातील किरकोळ वादामुळे थोडे मानसिक अस्वस्थ जाणवेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज विचारांच्या प्रवाहात कुठेही भरकटत जाणे टाळावे. स्वतःचे विचार दुसऱ्यांवर लादू नका.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जास्तीत जास्त वाचन लिखाणात वेळ घालवावा, महिला जास्तच लहरी बनतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज भावंडासंबंधी काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर ते सुट्टी घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात शिस्तबद्ध योजनेने बरेच काही साधून जाईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कामाचे स्वरूप समजावून घेऊन आखणी केली, तर यश जास्त लवकर मिळेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज आपले मुद्दे स्वतंत्रपणे ठासून मांडण्यात यशस्वी व्हाल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा>>
April 2025 Astrology: 3 एप्रिल 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर! मंगळ-बुधाच्या संक्रमणाने भाग्य असे चमकेल की, पैसा येईल चालून
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















