Chhaava Box Office Collection: 'सिकंदर'च्या वादळात 'छावा'ची नाव पार; विक्की कौशलचा चित्रपट 600 कोटींच्या जवळ, 46व्या दिवशी किती कमावले?
Chhaava Box Office Collection: विक्की कौशलचा 'छावा' हा चित्रपट गेल्या एका महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय. 'छावा' अजूनही कोट्यवधींची कमाई करत आहे.

Chhaava Box Office Collection Day 46: विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचा हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत आणि अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. विशेष म्हणजे, 'छावा' अजूनही कोट्यवधींची कमाई करत आहे. रिलीज होऊन दीड महिना उलटल्यानंतरही अजूनही 'छावा'च्या कमाईत घट पाहायला मिळालेली नाही. अजूनही चित्रपट कोट्यवधींमध्ये कमाई करत आहे. 46व्या दिवशीही 'छावा'नं धमाकेदार कामगिरी करत बक्कळ गल्ला जमवला आहे.
सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. 'सिकंदर' रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर भाईजानच्या स्टारडमचं वादळ येईल, असं बोललं जात होतं. पण, असं काहीच झाल्याचं पाहायला मिळालेलं नाही. उलट 'सिकंदर' रिलीज झाल्यानंतरही 'छावा' न डगमगता बॉक्स ऑफिसर बक्कळ गल्ला जमवत आहे. ईदच्या सुट्टीचा फायदा जेवढा 'सिकंदर'ला झाल्याचं पाहायला मिळालं नाही, त्यापेक्षा जास्त विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटाला झाल्याचं पाहायला मिळालं. आता फक्त काही पावलं मग 'छावा' मोठ्या थाटात 600 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल, असंच दिसतंय.
View this post on Instagram
'छावा' 600 कोटींपासून फक्त काही पावलं दूर
सॅक्निल्कच्या अहवालानुसार, 'छावा'नं 46 व्या दिवशी 1.27 कोटी रुपये कमावले आहेत. जे इतर दिवसांपेक्षा जास्त आहे. छावाने रविवारपेक्षा सोमवारी जास्त कमाई केली आहे. यानंतर चित्रपटाचं एकूण कलेक्शन 594.72 झालं आहे. जर चित्रपटानं असंच कलेक्शन केलं तर तो 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यास जास्त वेळ लागणार नाही.
'सिकंदर'समोर दणक्यात परफॉर्म करतेय 'छावा'
'सिकंदर' 30 मार्चला रिलीज झाला आहे. पण, पहिल्या दिवशी सुमार कामगिरी करणाऱ्या 'सिकंदर'नं ईदच्या मुहूर्तावर बक्कळ गल्ला जमवला आहे. अशातच 'सिकंदर' रिलीज झाल्यानंतरही 'छावा'नं कोट्यवधींचा गल्ला जमवणं खूप मोठी गोष्ट आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन इतका वेळ झाला तरी चांगलं कलेक्शन अपेक्षित नव्हतं. अशातच पहिल्या दिवशी 'सिकंदर', 'छावा'चा विक्रम मोडू शकलेला नाही. 'सिकंदर'नं पहिल्या दिवशी 30 कोटींची कमाई केली आहे. तर, 'छावा' 33 कोटींसह वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
दरम्यान, 'छावा'बाबत बोलायचं झालं तर, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर चित्रपटाचं कथानक आधारलेलं आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत विक्की कौशल झळकला आहे. तर, रश्मिका मंदानानं महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. तसेच, मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























