25 वर्षानंतर आयकॉनिक हेअर स्टाईल बदलली, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेच्या नव्या लूकची चर्चा
Abhijeet Bichukale : 25 वर्षानंतर आयकॉनिक हेअर स्टाईल बदलली, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेच्या नव्या लूक चर्चा

Abhijeet Bichukale :बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे मोठे केस, रंगबिरंगी गॉगल आणि हटके स्टाईल यामुळे ते महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर चर्चेत असतात.. गेले 25 वर्ष मोठ्या केसामध्ये पाहिलेल्या बिचुकले याने आता आपली हेअर स्टाईल केली आहे. दोन्ही बिग बॉस मध्ये ज्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण देशभर झाली होती.. अशातच त्यांचं नव्या लूक सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे..
अभिजीत बिचुकले म्हणाला, गेली 25 वर्ष आपली ती हेअर स्टाईल होती. ती आयकॉनिक हेअर स्टाईल संपूर्ण भारताच्या लक्षात राहिली. 25 वर्ष झाल्यामुळे माझे हेअर स्टाईलिस्ट यांनी आणि मी विचार केला आणि नवा हेअर कट केला. याच्यावर आता लोकांनी मांडायची आहेत. याच्यावर जाता जाता एकच बोलेन की, आगे आगे देखिए होता है क्या...
बिग बॉसमध्ये माझी हेअर स्टाईल खूप फेमस झाली होती. हिंदीबरोबर सलमान बरोबर सुद्धा माझी हेअर स्टाईल गाजली. त्यामुळे येणाऱ्या काळात माझे चाहते माझं अनुकरण करु शकतात, असंही बिचुकले म्हणाला.
पुढे बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाला, हेअर स्टाईल दोन्ही बिग बॉसमध्ये संपूर्ण भारताच्या तरुण पिढीच्या लक्षात राहिली. 25 वर्ष झाल्यामुळे माझे हेअर स्टाईलिस्ट आणि मी विचार करून हा नवा हेअर लूक बनवलेला आहे. तुमच्यासारख्या सुज्ञ पत्रकारांनी म्हटले म्हणजे नक्कीच माझ्या पाठीमागच्या हेअर स्टाईलची प्रचंड क्रेझ आहे. 2019 ला मराठी बिग बॉसमध्य काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये माझी हेअर स्टाईल खूप फेमस झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























