Sikandar Box Office Collection Day 2: रमझानला चाहत्यांकडून भाईजानला ईदी; 'सिकंदर'ची कमाई वाढली, दुसऱ्या दिवशी 50 कोटी पार, पण 'छावा'ला स्पर्शही करू शकला नाही
Sikandar Box Office Collection Day 2: ईदच्या दुसऱ्या दिवशी सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाची कमाई वाढली आणि चित्रपटानं रिलीजच्या दोन दिवसांत 50 कोटींचा टप्पा ओलांडला.

Sikandar Box Office Collection Day 2: बॉलिवूडचा (Bollywood Actor) दबंग भाईजानचा 'सिकंदर' (Sikandar Movie) ईद निमित्त रिलीज करण्यात आला. हा 2025 मधला सर्वात प्रतिक्षित चित्रपट होता. हा राजकीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट (Action Thriller Movie) रविवारी, 30 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला. चित्रपटाबद्दल चाहत्यांचा उत्साह पाहून असं वाटत होतं की, तो पहिल्या दिवशीच हिट होईल आणि चांगली कमाई करेल. तसेच, 2025 मधील सर्वात मोठ्या ओपनरचा रेकॉर्ड सध्या 'छावा'च्या (Chhaava) नावावर आहे, 'सिकंदर' (Sikandar) तो आपल्या नावावर करेल, असंही बोललं जात होतं. पण असं काहीच घडलेलं नाही.'सिकंदर' हा वर्षातील सर्वात मोठा ओपनर बनू शकला नाही. अशातच भाईजानच्या चित्रपटानं रिलीजच्या दुसऱ्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला? सविस्तर जाणून घेऊयात...
'सिकंदर' नं दुसऱ्या दिवशी किती कमाई केली?
सलमान खान आणि रश्मिका मंदाना ही जोडी 'सिकंदर'मध्ये दिसत आहे. ए.आर. मुरुगादोस दिग्दर्शित हा चित्रपट खूप अपेक्षांसह थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पण त्याची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ईदच्या सुट्टीचा चित्रपटाला फायदा होईल, असं निर्मात्यांना वाटलं होतं आणि दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाईही वाढली. पण 'सिकंदर' बक्कळ कमाई करू शकला नाही. आता 'सिकंदर'च्या रिलीजच्या दुसऱ्या दिवसाचे आकडेही आले आहेत.
View this post on Instagram
सक्निल्कच्या आकडेवारीनुसार, 'सिकंदर'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई केली.
सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सिकंदर'नं रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 29 कोटींची कमाई केली आहे.
यासह, 'सिकंदर'ची दोन दिवसांत एकूण कमाई आता 55 कोटी रुपये झाली आहे.
'सिकंदर' दुसऱ्या दिवशीही टॉप 10 चित्रपटांमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही
'सिकंदर'च्या दोन दिवसांच्या कमाईचे आकडे चांगले आहेत, पण सलमान खानच्या चित्रपटांना यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त कमाई होण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या दिवशी हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. सॅक्निल्कच्या रिपोर्टनुसार, दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांमध्ये मात्र, 'सिकंदर'नं स्थान पटकावलं आहे.
- 'पठान'नं दुसऱ्या दिवशी भारतात 68 कोटी कमावले
- दुसऱ्या दिवशी 'अॅनिमल'नं 58.37 कोटी रुपये कमावले.
- 'टायगर 3'नं दुसऱ्या दिवशी 58 कोटींचा व्यवसाय केला
- 'पुष्पा 2' चं दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन 56.9 कोटी रुपये होतं.
- 'KGF 2' ची दुसऱ्या दिवसाची कमाई 46.79 कोटी रुपये होती.
- 'जवान'नं दुसऱ्या दिवशी 46.23 कोटी रुपये कमावले.
- 'गदर 2' ची दुसऱ्या दिवसाची कमाई 43.08 कोटी रुपये होती.
- 'सिंघम अगेन'चा दुसऱ्या दिवशीचा कलेक्शन 42.5 कोटी रुपये होता.
- 'बाहुबली 2'नं दुसऱ्या दिवशी 40.5 कोटी रुपयांची कमाई केली.
- 'फायटर'ची दुसऱ्या दिवसाची कमाई 39.5 कोटी रुपये होती.
'सिकंदर' दोन दिवसांत अर्धं बजेटही वसूल करू शकलेला नाही
'सिकंदर' प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत आणि चित्रपटानं नुकताच 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाचं बजेट 200 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे आणि अशा परिस्थितीत तो दोन दिवसांत त्याच्या खर्चाच्या निम्मीही रक्कम वसूल करू शकलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रविवार आणि ईदच्या सुट्ट्यांमध्येही चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे विक डेजमध्ये चित्रपट कसा कामगिरी करतो? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























