एक्स्प्लोर

Sangli: दुष्काळी जत तालुक्याला कर्नाटकचं 'पाणी'; तुबची बबलेश्वर योजनेतून तिकोंडी तलावात सोडलं पाणी, कर्नाटकडून डिवचण्याचा प्रयत्न

आजही दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जत दौर्‍यावर असतानाच कर्नाटकने सोडलेल्या पाण्याने पूर्व भागातील तिकोंडी तलाव तुडूंब भरून वाहू लागला असल्याचं समोर आलं आहे. 

Sangli Jat Water Issue: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील (Sangli Jat News) काही गावांनी पाणी प्रश्नावरुन कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी म्हैसाळ पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची तत्वत: मान्यता दिली. असं असतानाही जतमध्ये अलिकडच्या काळात दिवसेंदिवस काही ना काही घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहेत. आजही दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जत दौर्‍यावर असतानाच कर्नाटकने सोडलेल्या पाण्याने पूर्व भागातील तिकोंडी तलाव तुडूंब भरून वाहू लागला असल्याचं समोर आलं आहे. 

महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याची संतप्त भावना 

कोणतेही आवर्तन जाहीर केले नसताना कर्नाटकने तुबची बबलेश्‍वर योजनेतून पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. जतच्या सीमावर्ती भागातील 40 गावांवर कर्नाटकने हक्क सांगितला असताना पूर्व भागाचा प्रलंबित पाणी प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जत पूर्व भागातील 65 गावांसाठी विस्तारित म्हैसाळ योजनेला राज्य सरकारने तत्वत: मंजुरी दिली असून ही योजना पूर्ण होईपर्यंत तातडीने पूर्व भागातील काही तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून भरून घेता येउ शकतील का? याचा आढावा घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाहणीसाठी आज जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी जत दौर्‍यावर होते.

तिकोंडी तलाव ओसंडून वाहू लागला

कर्नाटकने सीमावर्ती भागासाठी तुबची बबलेश्‍वर योजना गतीने पूर्ण केली असून या योजनेतून कर्नाटकातील इंडी आणि चडचणसाठी जत पूर्व भागातील तिकोंडीसह काही गावातून नैसर्गिक उताराने पाणी जाऊ शकते. याच स्थितीचा फायदा उठवत कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने कालपासून या योजनेचे पाणी यतनाळ ओढापात्रात सोडले असून या पाण्यामुळे तिकोंडी तलाव गुरूवारी ओसंडून वाहू लागला आहे. या कृतीद्वारे सीमावर्ती भागास कर्नाटकच तातडीने पाणी देऊ शकते हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न मानला जात आहे.

दरम्यान, म्हैसाळ विस्तारित योजनेबाबत वस्तुस्थिती निदर्शक अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना शासनाने दिले आहेत. या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी गुरूवारी जतचा पाहणी दौरा केला. जिल्हाधिकार्‍यांनी आज तिकोंडी तलावाची पाहणी केली, तसेच श्रीक्षेत्र गुड्डापूर येथे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेउन उमदीचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी जतच्या भौगोलिक स्थितीची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍याकडून नकाशाद्वारे घेतली.

ही बातमी देखील वाचा

सीमावर्ती भागातील जत तालुक्यामधील गावे पाणी प्रश्नावरुन आक्रमक, कर्नाटकात जाण्याचा महाराष्ट्र सरकारला इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
×
Embed widget