एक्स्प्लोर

वडिलांचं वय झालं, आई आजारी, मुलाचं शिक्षण....फिरण्यासाठी प्रचंड पैसा लागतो, स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षाचा जड अंतकरणाने राजीनामा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandeep Jagtap) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Sandeep Jagtap : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandeep Jagtap) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राजू शेट्टी साहेबांसोबत काम करत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण संदीप जगताप यांनी राजीनामा का दिला? असा सर्वांनाचं प्रश्न पडला असेल. याबाबत संदीप जगताप यांनी विविध गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये त्यांनी सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. संदीप जगताप नेमकं काय म्हणाले ते पाहुयात. 

आई आजारी, मुलाचे शिक्षण सुरु, नेमकं काय म्हणाले संदीप जगताप?

खूप जड अंतकरणाने राज्य कार्यकारणी समोर मी राजीनामा ठेवला आहे. राज्यभर व जिल्ह्यात देखील फिरण्यासाठी प्रचंड पैसे लागतात. वडिलांचे वय 72 झाले आहे. आई आजारी आहे. मुलाचे शिक्षण सुरू आहे. शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. कित्येक वर्षापासून नवीन पुस्तक आलं नाही. लेखन बंद झालं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन मी हा निर्णय घेतला असल्याचे संदीप जगताप म्हणाले. कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राजू शेट्टी साहेबांसोबत काम करत राहणार असल्याचे जगताप यांनी सांगितले आहे. 

माझ्या राजीनाम्याचा स्वीकार करतील, नव्या चेहऱ्याला संधी देतील

पुढील काही दिवसात राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणी माझ्या राजीनाम्याचा स्वीकार करतील व नव्या चेहऱ्याला संधी देतील अशी मला अपेक्षा असल्याचे जगताप म्हणाले. माझ्या कार्यकाळात माझ्याकडून कुठलीही अपेक्षा न करता नाशिक जिल्ह्यातील व राज्यातील देखील आपण सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांनी माझ्यावरती लहान भावासारखे प्रेम केले. माझे मत व केलेली छोटी- मोठी आंदोलने आपण राज्यभर पोहोचवली. त्याबद्दल नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांचे मी अंतकरणातून ऋण व्यक्त करतो असे संदीप जगताप यांनी म्हटलं. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली

संदीप जगताप हे गेल्या अनेक वर्षापासून राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सक्रीय होते. अनेक ठिकाणी झालेल्या मोठमोठ्या आंदोलनात देखील जगताप यांचा सक्रिय सहभाग होता. विशेषत:नाशिक जिल्ह्यात संदीप जगताप यांनी विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आंदोलन केली. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर शेती प्रश्नावर अन्याय होईल, त्या त्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीन संदीप जगताप यांनी खंबीरपणाने शेतकऱ्यांच्या बाजू लढवली होती. 

महत्वाच्या बातम्या:

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget