(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी
कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. चळवळीचा निखारा पेटता ठेवून राज्यभर विविध प्रश्नासाठी आंदोलने व मोर्चे चालूच ठेवावेत असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलं.
Raju Shetti : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. चळवळीचा निखारा पेटता ठेवून राज्यभर विविध प्रश्नासाठी आंदोलने व मोर्चे चालूच ठेवावेत असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलं. खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चळवळीचा मुकूट आपल्या डोक्यावर शोभून दिसतो असेही राजू शेट्टी म्हणाले.
22 आणि 23 जून रोजी बारामतीत स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारणीची बैठक
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजू शेट्टी यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पक्षाच्या राज्य कार्यकारणीची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी खचून न जाता चळवळीचा निखारा पेटता ठेवावा असे राजू शेट्टी म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची आज ॲानलाईन बैठक आयोजीत करण्यात आली होती. दरम्यान, बारामती येथे 22 आणि 23 जून रोजी स्वाभिमानीची राज्य कार्यकारणीची बैठक असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. शेतकरी आंदोलन आणि चळवळीशी प्रतारणा न करता चळवळ प्रामाणिकपणे करावी. शिवाय स्वाभिमानीचे राजकारण वेगळ्या पध्दतीने करावे अशा पध्दतीचे भुमिका मांडण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांना खचून न जाण्याच्या सूचना देखील यावेळी शेट्टींनी दिल्या.
राज्यामध्ये दुष्काळ, अवकाळी पावसाने मोठे नुकसान
सध्या राज्यामध्ये दुष्काळ, अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले असून महागाईमुळे शेतकरी पिचला गेला आहे. यामुळे कांदा, सोयाबीन, कापूस, ऊस, द्राक्ष, संत्रा, डाळींब, धान, मका उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मोर्चे व आंदोलने करून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील व संदीप जगताप यांच्या नेतृत्वात विविध प्रश्नावर राज्यभर दौरे सुरू करण्यात येणार आहेत. त्याबरोबरच विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर आल्याने कोल्हापूर , सांगली , सातारा ,पुणे , सोलापूर , लातूर , नांदेड , परभणी , अमरावती , बुलढाणा , नाशिक , नंदुरबार या जिल्ह्यातील विविध विधानसभेच्या जागेसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुका लढविण्याबाबत तसेच महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपात अनेक चांगले उमेदवारांना तिकीट मिळणार नसल्याने आपापल्या विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवारांची चाचपणी करुन विधानसभेला पुर्ण ताकदीने उमेदवार उभे करण्याची चर्चा झाली आहे. यावेळेस राज्यातील सर्व राज्य कार्यकारणीचे प्रमुख पदाधिकारी ऊपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
माझं काय चुकलं! शेतकऱ्यांनो तुम्हीही... पराभवानंतर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया