एक्स्प्लोर

Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी

कर्नाटक राज्य सरकार अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन करत आहे. या निर्णयामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, दुधगंगा व पंचगंगा नदीकाठच्या गावांना फटका बसणार आहे.

Raju Shetti on Almatti Dam : केंद्र सरकार व केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक राज्य सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाबाबत कठोर भुमिका घेऊन सदर निर्णयास स्थगिती देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील व केंद्रीय जल आयोगाचे  अध्यक्ष डॅा.  मुकेश कुमार सिन्हा यांचेकडे केली. 

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही

केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष डॅा. मुकेश कुमार सिन्हा म्हणाले की, कर्नाटक राज्य सरकारकडून अशा प्रकारचा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आला नाही. तसा प्रस्ताव आल्यास याबाबतचा सखोल अभ्यास करून कर्नाटक व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याशी व विविध तज्ञांशी बोलून स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून  पुरामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची दक्षता जल आयोगाकडून घेतली  जाईल.  कर्नाटक राज्य सरकार अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन करत आहे. या निर्णयामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, दुधगंगा व पंचगंगा नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसणार आहे. सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागातील बेळगांव व बागलकोट जिल्ह्यातील  पाणलोट क्षेत्रात असणारी जमीन पुराच्या पाण्याखाली जाणार असून नागरी वस्तीलाही याचा फटका बसणार आहे. 

आंबोलीपासून ते महाबळेश्वरपर्यंत जवळपास 220 किलोमीटर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर  पडणारा पाऊस हा अनेक उपनद्यांच्या माध्यमातून शिरोळ येथील कृष्णा नदीत येतो. कृष्णा नदीचा प्रवाह संथ असल्याने महापुरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुर परिस्थीती नियंत्रणात येण्यास जवळपास 15 ते 20 दिवस लागतात. जर कर्नाटक सरकारने अलमट्टीची उंची वाढविल्यास सध्यापेक्षाही कृष्णेच्या पाण्याचा वेग कमी होवून महापुर काळात जवळपास 35 ते 40 दिवसानंतर पुर परिस्थिती नियंत्रणात येईल. यामुळे सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागातील शेती, व्यापार, उद्योग, आरोग्य व अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Passes Away: नाना पाटेकरांचं निधन, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार भावूक; डोळे पाणावणाऱ्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं?
नाना पाटेकरांचं निधन, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार भावूक; डोळे पाणावणाऱ्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं?
Nana Patekar Passes Away: 'करारी अभिनेता आपण गमावला!' नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातूनही शोक; शरद पवारांसह दिग्गज नेते भावूक, कोण काय म्हणालं?
'करारी अभिनेता आपण गमावला!' नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातूनही शोक; शरद पवारांसह दिग्गज नेते भावूक, कोण काय म्हणालं?
Dharashiv News: दुधातून पाणी वेगळं... तेही पिण्यासाठी! दुष्काळी धाराशिवमध्ये खवा उद्योजकाचा भन्नाट 'राजहंस' प्रयोग; पाणी अन् विजेचीही मोठी बचत
दुधातून पाणी वेगळं... तेही पिण्यासाठी! दुष्काळी धाराशिवमध्ये खवा उद्योजकाचा भन्नाट 'राजहंस' प्रयोग; पाणी अन् विजेचीही मोठी बचत
Central Railway Mega Block: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल कुठपर्यंत धावणार? एक्स्प्रेस किती उशिराने? जाणून सविस्तर घ्या
प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल कुठपर्यंत धावणार? एक्स्प्रेस किती उशिराने? जाणून सविस्तर घ्या

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Embed widget