एक्स्प्लोर

पालकांचं स्थलांतर आणि विद्यार्थ्यांची घसरणारी पटसंख्या रोखण्यासाठी पालघरमधल्या शिक्षकाची नामी शक्कल

रोजगारासाठी कुटुंब स्थलांतरित होतं, सोबतच शिकण्यासारखी मुलेही स्थलांतरित होऊन शाळेची पट संख्या घसरते. हे रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यातील खोमरपाडा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने चक्‍क शाळेच्या आवारातच शेती सुरु केली.

पालघर : पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात रोजगारासाठी होणाऱ्या स्थळांतरणामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरत चालली आहे. ही घसरण रोखण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी बुद्रुक येथील खोमरपाडा येथील शिकक्ष बाबू चांगदेव मोरे यांनी नामी शक्कल लढवली आहे. त्यांनी आपल्या शाळेच्या आवारातच या मुलांच्या पालकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. बाबू मोरे यांनी शाळेच्या परिसरात भेंडी, वांगी, पालक, मेथी, आले, बटाटे, कांदे लागवड करुन पालकांना रोजगार उपलब्ध करुन दिल्याने घटणारी पटसंख्या रोखण्यात मोरे यांना यश आलं आहे.

बीड जिल्ह्यातील चाकरवाडी इथले बाबू चांगदेव मोरे हे पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यातील जांभे गावात जिल्हापरिषद शाळेत शिक्षक म्हणून 2009 मध्ये रुजू झाले. त्यांनी 2009 ते 2013 या काळावधीत त्यांनी शिक्षक म्हणून आपल काम केले. पुढे ते याच तालुक्यातील डोल्हारी बुद्रुक गावातील खोमारपाडा येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत जिल्हापरिषदेच्या शाळेत रुजू झाले आणि तेथूनच या त्यांच्या या अनोख्या उपक्रमाला सुरुवात झाली.

पालकांचं स्थलांतर आणि विद्यार्थ्यांची घसरणारी पटसंख्या रोखण्यासाठी पालघरमधल्या शिक्षकाची नामी शक्कल

विक्रमगड तालुक्यातील आदिवासी बहुल खुमारपाडा गावातील लोकवस्ती जवळपास 1500 आहे. या गावातील 35 कुटुंब परिसरात रोजगार नसल्याने दरवर्षी स्थलांतरित होत असतात. यातील कुटुंब रोजगारासाठी वीटभट्टी व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, इतर कामासाठी ते मुंबई, भिवंडी, वसई भागात स्थलांतर करत होते. मात्र याचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्याने सहशिक्षक बाबू मोरे यांनी गावातील नागरिकांना शेतीचं आणि शिक्षणाचं महत्त्व पटवून देत गावातच शेती करण्याचं मार्गदर्शन केलं. गावातील नागरिकांनीही सहकार्य करत गावातच शेती करुन आपली आर्थिक गणित मजबूत करण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळातही बाबू मोरे यांनी आखलेल्या या योजनेचा गावातील विद्यार्थ्यांबरोबर गावकऱ्यांनाही फायदा झाला.

पालकांचं स्थलांतर आणि विद्यार्थ्यांची घसरणारी पटसंख्या रोखण्यासाठी पालघरमधल्या शिक्षकाची नामी शक्कल

गावातील नागरिकांच्या सहकार्याने बाबू मोरे यांनी तालुका पंचायत समिती कृषी विभाग आणि तालुका कृषी विभाग यांच्या मदतीने शेती करण्यास सुरुवात केली. शाळेच्या आवारात भेंडी, वांगी, पालक, मेथी, आले, बटाटे, कांदे पिकू लागले. शाळेचा परिसर शेतीमय झाला. या उपक्रमाला मुंबईतील अक्षरधारा या संस्थेने पीक लागवडीसाठी एक लाख 35 हजार रुपये अर्थसहाय्य केलं. 2019-20 या वर्षात या उपक्रमातून 35 टन कांद्याचं उत्पन्न घेतलं.

पालकांचं स्थलांतर आणि विद्यार्थ्यांची घसरणारी पटसंख्या रोखण्यासाठी पालघरमधल्या शिक्षकाची नामी शक्कल

बाबू मोरे या शिक्षकाने हाती घेतलेला हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. यामुळे आदिवासी गरजूंना रोजगार तर मिळाला मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग ही सुकर झाला. त्यामुळे बाबू मोरे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget