एक्स्प्लोर

Morning Headlines 4th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

Weather Update Today: कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे पावसाची आशा, वाचा काय सांगतोय हवामान विभागाचा अंदाज

भारत : राजधानी दिल्लीसह (Delhi) देशातील काही भागांमध्ये उष्णेतची लाट कायम राहणार आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये पावसाची (Rain) शक्यता देखील भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून ओदिशा, तेलंगणा, केरळच्या विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर दिल्लीकरांना सध्या तरी उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. तसेच, येत्या काही दिवसांमध्ये दिल्लीमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तर सोमवार 4 सप्टेंबर रोजी कमाल आणि किमान तापमान हे क्रमश: 37 आणि 27 अंश सेल्सियस असणार असल्याचा अंदाज हवामान विभाकडून देण्यात आला आहे. वाचा सविस्तर 

Assam Flood: आसाममधील काही भागांत पूरस्थिती कायम, 583 गावं अजूनही पाण्याखालीच; 1.22 लाख लोकांना फटका

Assam Flood: आसाममध्ये आलेल्या पुरामुळे (Flood) मोठ्या प्रमाणात लोक प्रभावित झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) ने रविवारी (3 सप्टेंबर) आपल्या अधिकृत माहितीत सांगितल्याप्रमाणे, आसाममधील (Assam) परिस्थिती सुधारली आहे. मात्र, सात जिल्ह्यांतील 1.22 लाखांहून अधिक लोक अजूनही पुराचा सामना करत आहेत. यामध्ये बारपेटा, चिरांग, दररंग, गोलाघाट, कामरूप महानगर, मोरीगाव आणि नागाव जिल्ह्यांचा समावेश आहे. वाचा सविस्तर 

ABP C Voter Survey: एवढ्या मोठ्या देशात 'One Nation, One Election' लागू करता येईल? लोकांचं म्हणणं काय?

ABP C Voter Survey On One Nation One Election: देशात आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) तयारीत सर्वच पक्ष व्यस्त आहेत. दरम्यान, केंद्र सरकारनं (Central Government) 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत (One Nation, One Election) उच्चस्तरीय समिती स्थापन केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस (Congress), आप (AAP) आणि विरोधी आघाडी इंडियातील (I.N.D.I.A Alliance) इतर अनेक पक्षांनी या मुद्द्यावर विरोध दर्शवला आहे. भाजप (BJP), बीजेडी (BJD), एआयएडीएमकेसह अनेक पक्ष त्यांच्या समर्थनात आहेत. वाचा सविस्तर 

4th September In History : गुगलची स्थापना, दादाभाई नौरोजी आणि ऋषी कपूर यांचा जन्म; आज इतिहासात

4th September In History : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे संस्थापक दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी झाला होता. दादाभाई नौरोजी एक थोर, विचारवंत आणि राजकारणीही होते. दादाभाई नौरोजी यांची आज जयंती आहे. यासोबतच चार दशकं बॉलिवूड गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचीही आज जयंती आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या सर्व प्रश्नांनी उत्तरे देणाऱ्या सर्च इंजिन गुगलचा शोधही 4 सप्टेंबर रोजी लागला होता. वाचा सविस्तर 

Weekly Horoscope 04 September to 10 September 2023 : आजपासून सुरु होणारा आठवडा 'या' राशींसाठी चांगल्या संधी घेऊन येणार! वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 04 September to 10 September 2023 : सप्टेंबर महिन्यातला हा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. हा आठवडा धनु, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी अनेक संधी घेऊन येणारा असेल. एकूणच 12 राशींचा हा आठवडा कसा असणार आहे? यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात. वाचा सविस्तर 

Horoscope Today 4 September 2023 : वृषभ, सिंह, धनु राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 4 September 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही इतरांचा आदर कराल. तर, कर्क राशीच्या लोकांनी कोणत्याही वादात पडू नये, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार नेमका कसा असणार आहे? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget