ABP C Voter Survey: एवढ्या मोठ्या देशात 'One Nation, One Election' लागू करता येईल? लोकांचं म्हणणं काय?
ABP C Voter Survey: 'वन नेशन, वन इलेक्शन' या राजकीय चर्चेदरम्यान, सी-व्होटरनं देशातील लोकांचा मूड जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी संपूर्ण देशभरात सर्वेक्षण केलं आहे.

ABP C Voter Survey On One Nation One Election: देशात आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) तयारीत सर्वच पक्ष व्यस्त आहेत. दरम्यान, केंद्र सरकारनं (Central Government) 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत (One Nation, One Election) उच्चस्तरीय समिती स्थापन केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस (Congress), आप (AAP) आणि विरोधी आघाडी इंडियातील (I.N.D.I.A Alliance) इतर अनेक पक्षांनी या मुद्द्यावर विरोध दर्शवला आहे. भाजप (BJP), बीजेडी (BJD), एआयएडीएमकेसह अनेक पक्ष त्यांच्या समर्थनात आहेत.
'वन नेशन, वन इलेक्शन' या विषयावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ram Nath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लोकसभा (Lok Sabha Elections 2024) आणि राज्य विधानसभा (State Assembly) आणि स्थानिक स्वराज्य संस्था (Local Body Election) यांच्या निवडणुका एकत्र घेण्याच्या शक्यतेचा विचार करेल आणि यासंदर्भात शिफारसी देईल. या मुद्द्यावर देशातील लोकांची मतं जाणून घेण्यासाठी सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी संपूर्ण देशभरात सर्वेक्षण केलं आहे. जाणून घेऊयात, या सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय सांगतोय, त्याबाबत सविस्तर...
'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत जनतेचा कौल काय?
या सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आलं आहे की, एवढ्या मोठ्या देशात 'वन नेशन, वन इलेक्शन' लागू होऊ शकतं का? या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या 59 टक्के लोकांनी उत्तर दिलं की, होय, एवढ्या मोठ्या देशात 'वन नेशन, वन इलेक्शन' लागू केलं जाऊ शकतं. तर 35 टक्के लोकांनी नकारार्थी उत्तर दिलं आहे. तर, याबाबत काहीच सांगू शकत नाही, असं 6 टक्के लोकांनी सांगितलं आहे.
'वन नेशन, वन इलेक्शन' एवढ्या मोठ्या देशात लागू केलं जाऊ शकतं?
हो : 59 टक्के
नाही : 35 टक्के
काहीच सांगू शकत नाही : 6 टक्के
टीप: सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी संपूर्ण देशभरात हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात 4 हजार 182 लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. शनिवारपासून आज दुपारपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सर्वेक्षणात मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे. सर्वांचे निकाल पूर्णपणे जनतेशी बोलून आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहेत. त्यामुळे एबीपी न्यूज यातून कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
संजय राऊत लोकसभेच्या रिंगणात उतरणार? ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची कुजबुज, म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
