एक्स्प्लोर

Horoscope Today 4 September 2023 : वृषभ, सिंह, धनु राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 4 September 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 4 September 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही इतरांचा आदर कराल. तर, कर्क राशीच्या लोकांनी कोणत्याही वादात पडू नये, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार नेमका कसा असणार आहे? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जबाबदारीने भरलेला असेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमच्या बोलण्यातल्या गोडव्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला आकर्षित करू शकता. तुम्हाला आर्थिक लाभही मिळेल. तरुणांना करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. सध्याच्या काळानुसार स्वत:ला जुळवून घ्या. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्ही ऑनलाईन कोर्सही करू शकता. आज आरोग्याची विशेष काळजी घ्या. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मुलाच्या बाजूनेही तुमचे मन समाधानी राहील. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा तणावाचा असेल. आजचा दिवस नोकरदार लोकांसाठी थोडा चिंतेचा असेल. आज तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. अहंकारामुळे तुमचे व्यावसायिक संबंध बिघडू शकतात, यासाठी वाणीत गोडवा ठेवा. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज सहकार्‍याच्या अनुपस्थितीमुळे तुमच्यावर कामाचा जास्त ताण असू शकतो, ज्यामुळे तुम्ही खूप चिडचिडे देखील होऊ शकता. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी अतिशय शुभ राहील. तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळेल आणि त्यामुळे तुमचे आर्थिक संकटही दूर होतील. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करण्याआधी संबंधित व्यक्तीशी चर्चा करा. योग्य विचार करूनच तुमचे पैसे गुंतवा. तुम्हाला जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. जे लोक अनेक दिवसांपासून व्यवसायाशी संबंधित प्रकरणांमुळे अडचणीत होते त्यांना त्यांच्या व्यवसायात फायदा होऊ शकतो आणि तुमची आर्थिक कमतरता देखील दूर होऊ शकते. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुम्हाला कोणत्याही गंभीर आजाराने ग्रासले असल्यास, तुमची औषधे वेळेवर घ्या. कुटुंबाचं सहकार्य नेहमी तुमच्या पाठीशी असणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. त्यामुळे दिवस उत्साही असेल. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असेल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असेल. तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. व्यवसायात जास्त काम केल्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. तुम्ही तुमच्या वडीलधार्‍यांचा आदर करणं गरजेचं आहे. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. 

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा चांगला जाईल. तुमचा व्यवसाय अधिक तांत्रिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी, तुम्ही सध्यापासून काही नवीन उपकरणे खरेदी करण्याची योजना करू शकता. तरूण आपल्या करिअरबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करेल. आज तुमच्या घरातून नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मकतेसाठी घरी पूजा, पाठ, हवन कीर्तन इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन करत राहा. व्यायामावर भर द्या.  

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये नवीन काम करण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करावा लागेल. नवीन पद्धतीने काम केल्यास तुमची प्रशंसा होईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमची आर्थिक समस्या दूर होईल. तरुणांनी आपले काम करण्यापूर्वी थोडा विचार करावा, काम करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घ्या. घरात शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असू शकतो. जर तुम्ही नोकरी करत असाल तर आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक चणाव जाणवू शकतो. कामाचा ताण जास्त असल्यामुळे तुमची चिडचिडही होऊ शकते. यासाठी तुम्ही वाणीवर संयम ठेवणं गरजेचं आहे. संध्याकाळचा वेळ कुटुंबीयांबरोबर किंवा मित्रांबरोबर धार्मिक स्थळी घालवा. जेणेकरून तुमच्या मनाला शांती मिळेल. तसेच, नियमित योगा, व्यायाम करत राहा. तुमच्या मुलाच्या शिक्षणाबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा धावपळीचा असेल. तर, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. तरुणांनी छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड करणं टाळलं पाहिजे. भविष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आजपासूनच पैसे वाचवावे लागतील. अन्यथा तुमच्या भविष्यात पैशाची कमतरता भासू शकते. आज तुम्हाला पोटाच्या जळजळीशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. पोट निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांमुळे तुमचे मनही प्रसन्न राहील.

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. उद्या तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी कितीही मेहनत केली असेल, तुमची मेहनत पाहून तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. ज्यांनी नुकताच नवीन व्यवसाय सुरू केला आहे, त्यांना त्यांच्या व्यवसायाबाबत काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचे काही नुकसान होऊ शकते. मोठे आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे. तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार दूर करा. सकारात्मकतेसाठी, तुमच्या मित्रांसह सहलीला जा. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमची प्रकृती ठीक राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला कोणत्याही विषयावर नवीन चांगली बातमी मिळू शकते.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आज काही चांगली बातमी मिळू शकते. जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुम्ही तुमच्या मुलांबाबत समाधानी असाल, पण तुमच्या जोडीदाराच्या वागण्याने तुम्ही थोडे दु:खी व्हाल. आज अनावश्यक गोष्टींचा ताण घेणे टाळा. भूतकाळातील गोष्टींकडे लक्ष देऊ नका, आपल्या भविष्याची चिंता करा आणि वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. मानसिक शांततेसाठी धार्मिक स्थळाला लवकरच भेट द्या. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही कोणत्याही कार्यक्षेत्रात व्यवसाय कराल, त्यात तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, आज तुम्हाला दातांच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो, यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करा. तुम्ही तुमच्या मुलांबाबत समाधानी असाल, परंतु तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल. काही कारणास्तव, तुमच्या घरी पाहुणे येत-जात असतील, ज्यामुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. तुमच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 3 September 2023 : मिथुन, सिंह, धनुसह 'या' राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
Embed widget