एक्स्प्लोर

Omicron : महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, डोंबिवलीत आढळला रुग्ण

Maharashtra Omicron Case: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटची महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रुग्णाने कोरोनाची लस घेतलेली नाही.

Maharashtra Omicron Case: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटची महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. डोंबिवलीमध्ये दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. देशातील  चौथा ओमायक्रॉनचा रुग्ण आहे. याआधी कर्नाटकमध्ये दोन आणि गुजरातमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला होता. 

ओमायक्रॉनची लागण झालेला तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला होता. तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. सध्या या तरुणाला फक्त सौम्य लक्षणं आढळली आहेत. कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये तरुण उपचार घेत आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 12 अति जोखमी व्यक्तींना तसेच इतर 23 कमी जोखमीच्या निकटवर्तींचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोरोना चाचणीत निगेटिव्ह आढळले आहेत.

या तरुणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. याशिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.. दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या 60 वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही.

Omicron : महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, डोंबिवलीत आढळला रुग्ण

चार डिसेंबर रोजी सकाळपर्यंत मुंबई विमानतळावर हाय रिस्क देशातून आलेल्या 3839 प्रवाशांची आर.टी.पी.सी.आर तपासणी करण्यात आली. तर इतर देशांमधून आलेल्या 344 प्रवाशांचीही आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. विमानतळावर एक डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान आठ प्रवाशी कोरोनाबाधित आढळले आहेत. या सर्वांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात एक नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.   

 

संबंधित  बातम्या :

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Shivsena Opration Tiger: शिंदेंकडे गेलेले 6 पैकी 2 खासदार पुन्हा येणार, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ; माघारी येण्याचं कारणही सांगितलं!
शिंदेंकडे गेलेले 6 पैकी 2 खासदार पुन्हा येणार, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ; माघारी येण्याचं कारणही सांगितलं!
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंचा फोन अन् महायुतीच्या नंदकिशोर महाजनांच्या विजयाच्या मार्ग मोकळा, जळगाव विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट
एकनाथ शिंदेंचा फोन अन् महायुतीच्या नंदकिशोर महाजनांच्या विजयाच्या मार्ग मोकळा, जळगाव विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Embed widget