Omicron : तुम्हाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं कसं ओळखणार? जाणून घ्या कसं शोधायचं या नव्या व्हेरियंटला
Omicron : ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याचं आता RTPCR चाचणीतून लक्षात येणार आहे. त्यामुळे आता ओमिक्रॉनच्या निदानासाठी जिनोम सिक्वेसिंगची गरज नाही.
मुंबई : जगभरात ओमिक्रॉनचं संकट आता अधिक गडद होतं असल्याचं दिसून येतंय. दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेल्या भारतालाही याला समोरं जावं लागणार आहे. सध्याची लस यावर प्रभावी ठरतेय की नाही हे अजून स्पष्ट व्हायचंय. पण मग या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंट ची लागण झालीय ती कशी ओळखायची असा प्रश्न समोर आहे. यावर उत्तर सापडलं असून एखाद्या व्यक्तीच्या जीन्समध्ये 'S' या जीन्सची कमी असेल किंवा तो सापडला नाही तर त्या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली असल्याचं स्पष्ट होतंय.
आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांनी संबंधित व्यक्तीच्या तिन्ही म्हणजे N, S, E जीन्सची RTPCR चाचणी करण्याची शिफारस केली आहे. एखाद्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी केली असता त्यामध्ये जर N आणि E जीन्स आढळून आले आणि S जीन्स आढळले नसेल तर त्या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली असल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित होतं. ही पद्धत वापरल्यास ओमिक्रॉनच्या निदानासाठी जिनोम सिक्वेसिंगची गरज नाही. महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली. पण सध्या बहुतांश लॅबोरेटरी RTPCR ची टेस्ट करताना S जीन्सची तपासणी करत नाहीत, आणि हे धोकादायक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
त्यामुळे सर्व लॅबोरेटरींनी RTPCR ची टेस्ट करताना S जीन्स बद्दल माहिती घेणं बंधनकारक करण्यात येणार असून लवकरच तशा सूचना देण्यात येणार असल्याच सांगण्यात येतंय. दरम्यान, आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. अशातच राज्यसभेत बोलताना देशात सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही, अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत दिली आहे. संशयास्पद रुग्ण आढळल्यास तातडीनं तपासणी केली जात असल्याचंही आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :
- Omicron Virus : ओमिक्रॉनशी लढण्याकरता मुंबई सज्ज, पालिका आयुक्तांची ग्वाही
- Dr. Angelique Coetzee On Omicron: ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांमधील ऑक्सिजनची पातळी कमी होते? वाचा काय म्हणाल्या डॉ. अँजेलिक कोएत्झी
- दिलासादायक! ओमिक्रॉनचा एकही रुग्ण भारतात नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra School Reopen : नाशिकमध्ये 10 डिसेंबर, मुंबई-पुण्यात 15 डिसेंबर, तुमच्या जिल्ह्यात शाळा कधी उघडणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha