Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 24 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE

Background
परभणी जिल्ह्यात 24 तासात 301 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
परभणी जिल्ह्यात 24 तासात 301 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 96 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2234 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आज दिवसभरात अकोल्यात 215 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
आज दिवसभरात अकोल्यात 215 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 2595 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 3377 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 3931 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुण्यात गेल्या 24 तासात 3377 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3931 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 554255 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 46302 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 12543 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 148 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 148 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 121 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 881 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबईत ओमायक्रॉनचे प्रमाण सुमारे 88 टक्के
मुंबईत ओमायक्रॉनचे प्रमाण सुमारे 88 टक्के, तर डेल्टा आणि डेल्टाच्या उपप्रकारांचे प्रमाण सुमारे 10 टक्के रुग्ण आढळले आहेत. कस्तुरबा प्रयोगशाळेतील जिनोम सिक्वेंसिंगचा अहवालात ही माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
