एक्स्प्लोर

कोरोना काळातही शासकीय रुग्णवाहिका मृत्युशय्येवर ; पालघर आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार

चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका देण्यात यावी किंवा गेले काही महिने बंद असलेले रुग्णवाहिका तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोना सारख्या महामारीने थैमान घातलं असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तर  मृतांच्या संख्येमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र असं असताना पालघरच्या आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार सातत्याने समोर येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत याचं कोणतेही सोयरसुतक आरोग्य विभागाला पडलेल दिसत नाही.

जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्राला रुग्णांना ने आण करण्यासाठी रुग्णवाहिका दिल्या आहेत, परंतु या रुग्णवाहीकांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने त्या मोडकळीस येऊन धूळ खात पडल्याचं चित्र समोर आलं आहे. पालघर जिल्ह्यातील काही शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिकांची ही अवस्था आहे. तर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या अत्यावश्यक सेवेकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय.

पालघर जिल्ह्यातील चिंचणी वाणगाव हा विभाग मोठा असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या ठिकाणच्या रुग्णवाहिका गेल्या सात ते आठ महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहेत. चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून नादुरूस्त रुग्णवाहिकेची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे डिसेंबर 2020 मध्ये पत्रव्यवहार झालेला आहे. कोरोना काळ असतानाही सहा महिने उलटून गेले तरीही जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा झोपेत असल्याचं पाहायला मिळते. या पत्रावर कोणताही विचार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला नसल्याने अजूनही ही रुग्णवाहिका दुरुस्तीअभावी धूळ खात पडली आहे. यामुळे चिंचणी वाणगावसारखा मोठ्या लोकवस्तीतील नागरिकांना शासकीय रुग्णालयात रुग्ण दाखल करणे किंवा त्याला इतरत्र हलवणे यासाठी कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आत्तापर्यंत अनेक वेळा स्थानिकांनी ही याबाबतीत तालुका आणि जिल्हा पातळीवर पाठपुरावा केला आहे. तरीही आरोग्य विभाग झोपेचे सोंग घेत आहे,. कोरोना काळात तर मोठ्या प्रमाणात या भागातील रुग्णांना  रुग्णवाहिका विना हालअपेष्टांना सामोरे जावे लागले आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्रमगड या तालुक्यांना आमदार निधीतून 12 रुग्णवाहिका नुकत्याच देण्यात आले आहेत. या अगोदर तिकडची परिस्थिती चिंचणी वाणगाव विभाग सारखीच होती. सध्या वानगावसाठी एक रुग्णवाहिका आमदार निधीतून देण्यात आली आहे. मात्र तीही रुग्णवाहिका तशीच उभी असून कोरोना रुग्णांसाठी कोणताही वापर होत नसल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या  आरोग्य यंत्रणेवर सध्या प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच जिल्ह्यातील व्हेंटिलेटर इतर जिल्ह्यात पाठवणे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या अत्यावश्यक सेवेकडे दुर्लक्ष करणे या बाबी प्रकर्षाने पुढे येत आहेत यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका देण्यात यावी किंवा गेले काही महिने बंद असलेले रुग्णवाहिका तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget