एक्स्प्लोर

खडसेंच्या 'दे धक्क्यानंतर' फडणवीसांचं पक्षातलं इंजिनियरिंग सुरु!

अतिवृष्टीच्या दौऱ्याच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांनी पक्षासाठी सोशल इंजिनियरिंग करण्यास सुरुवात केली यात शंका नाही. फडणवीसांच्या तीन दिवसांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात याचा प्रत्यय आला.

मुंबई : खडसेंनी भाजपला दिलेल्या सोडचिट्ठीनंतर देवेंद्र फडणवीस सतर्क झाले आहेत. इतर पक्षातून आयात केलेले नेते आणि पक्षांतर्गत विरोधकांना सांभाळणं हे फडणवीसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असेल. त्यामुळेच त्यांची मर्जी राखून वेळप्रसंगी पक्षांतर्गत विरोधकांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न फडणवीस करताना दिसतायत. त्याचा प्रत्यय आलाय फडणवीस यांच्या तीन दिवसांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात.

पवारांच्या बारामतीतून फडणवीस यांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळीस फडणवीस यांचं बारामती विमानतळावर स्वागत केलं रासपतून भाजपत आलेले राहुल कुल, राष्ट्रवादीतून आलेले खासदार रणजितसिंह निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, काँग्रेसचे जयकुमार गोरे, वंचितमधून आलेले गोपीचंद पडळकर आणि अर्थात सोबत होते मनसेतून आलेले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी. पुणे जिल्ह्यातील दौरा करून फडणवीसांनी दुपारचं जेवण केलं हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापुरातील बंगल्यावर.

Eknath Khadse | नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलंय, योग्य वेळी बोलेन : देवेंद्र फडणवीस

त्यानंतर पहिल्या दिवशी उस्मानाबादेत मुक्काम केला पवारांचे एकेकाळचे स्वकीय राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरी. आदल्याच दिवशी उस्मानाबादेत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबियांना पून्हा पक्षात 'नो एन्ट्री' असल्याचं स्पष्ट केलं होतं. तर लगेच दुसऱ्या दिवशी दौऱ्यादरम्यान राणा जगजितसिंहांनी फडणवीसांना स्वतःच्या गाडीत बसवून स्टिअरिंग व्हिल हातात घेऊन अख्ख्या दौऱ्याचं स्वारथ्य केलं होतं.

खडसेंच्या 'दे धक्क्यानंतर' फडणवीसांचं पक्षातलं इंजिनियरिंग सुरु!

विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी दौऱ्याचा भाग नसतांना वाट आडवी करून फडणवीस यांनी बीडमध्ये अचानक ताफा गोपीनाथ गडाकडे वळवला आणि मुंडेंचं दर्शन घेऊन सर्व कार्यकर्त्यांना सुखद धक्का दिला. सोबत पंकजा आणि प्रतिमा मुंडे नसतांना या दर्शनाची बीडमध्ये चांगलीच चर्चा रंगली. त्यांनतर आंबेजोगाईच्या शेतकरी मेळाव्याचं नियोजन राष्ट्रवादीतून आलेले आमदार सुरेश धस आणि नमिता मुंदडा यांच्या देखरेखीत केलं होतं.

पुढे लातूर मधल्या औसामध्ये पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि आता भाजपचे आमदार रमेश कराड यांच्या घरी जेवण केलं. मग गंगाखेड मध्ये रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेंच्या फार्म हाऊसवर शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. विशेष म्हणजे या संवाद सभेत गुट्टे यांनी वेळ पडली तर सरकारच्या विरोधात लाखांचा मोर्चा काढण्याची आणि फडणवीसांनी ताकद देण्याची तयारी दर्शवली. त्यापुढे परभणीत मोहन फड यांच्या घरी सांत्वनाला गेलेल्या फडणवीसांसोबत पंकजा मुंडे दौऱ्यात सहभागी झाल्या. त्या रात्री फडणवीसांनी पुन्हा राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश करून आमदार झालेल्या मेघना बोर्डीकर यांच्या घरी मुक्काम केला.

खडसेंच्या 'दे धक्क्यानंतर' फडणवीसांचं पक्षातलं इंजिनियरिंग सुरु!

तिसऱ्या दिवशी परभणी, हिंगोली, जालना ते औरंगाबाद या संपूर्ण दौऱ्यादरम्यान खडसेंच्या सोडचिट्ठीच्या बातमीने चांगलाच जोर धरला होता. मात्र त्यावेळेस सोबत पंकजा मुंडे असल्याने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून होतांना दिसला. अर्थात या सर्व आयतांच्या घरचा पाहुणचार फडणविसांसाठी जरी निव्वळ दौऱ्याचा भाग असला तरी त्या-त्या नेत्यांसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी स्थानिक राजकारणात तो प्रचंड बळ देणारा ठरतो. त्यामुळे अतिवृष्टीच्या दौऱ्याच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांनी सोशल इंजिनियरिंग करण्यास सुरुवात केली यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget