(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझा दौरा ग्राउंडवर होता, हायवेवरुन पाहणी केली नाही; खासदार संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला?
मराठवाड्यातील पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. माझा दौरा ग्राउंडवर होता, हायवेवर पाहणी केली नाही; असा टोला खासदार संभाजीराजेंनी लगावला.
पुणे : मराठवाड्यातील पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज पुण्यातील पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला. मराठवाड्यात परतीच्या पावसाने झालेल्या अतोनात नुकसानाची वस्तुस्थिती त्यांनी विशद केली. पुराची इतकी गंभीर परिस्थिती पाहून मला राहावलं नाही आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मी फिरलो असं संभाजीराजे यांनी सांगितलं.
मी चिखलात चालत गेलो. ट्रॅक्टरवर बसून गेलो. माझे दौरे ग्राउंडवर होते. हायवेवर पाहणी करून निघून गेलो असे माझे दौरे नव्हते, असं टोलाही संभाजीराजे यांनी लगावला. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांना पुलावरुन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यामुळे संभाजीराजेंचा हा टोला उद्धव ठाकरेंसाठी तर नव्हता ना, अशी चर्चा सुरु झाली. याच पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजेंनी राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली. तसंच मदतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, असंही सांगितलं.
Eknath Khadse | नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलंय, योग्य वेळी बोलेन : देवेंद्र फडणवीस
कोरोनामुळे सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे पण आपला पोशिंदा जगला पाहीजे आणि त्यासाठी पैसे ऊभे केले पाहीजे, असं संभाजीराजे यांनी सांगितलं. प्रती हेक्टर 50 हजार मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचंही संभाजीराजे यांनी सांगतिलं. पुर्ण मदत एकाच वेळेस हवंतर करु नका पण निदान मदतीची सुरुवात म्हणून तरी काही तरी मदत शेतकऱ्यांना करावी अशी मागणी संभाजीरीजे यांनी केली. आता जर मदत मिळाली नाही तर रब्बीच्या हंगामासाठी शेतकरी कशी तयारी करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नाही : मुख्यमंत्री दरम्यान, आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत लोकप्रियतेसाठी किंवा टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नाही, असे म्हटले. मी पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेटलो त्यांच्याशी संवाद साधला. जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करणार आहोत. नुकसान मोठं आहे. मी इथे दौरा करतो आहे आणि तिकडे मंत्रालयात मदत कशी आणि कधी करायची त्यासंदर्भात कामही सुरु झाले आहे. पंचनामे जवळपास झाले आहेत. त्यामुळे नुसता विचार नाही पण प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा ते आम्ही पाहतो आहोत. दोन तीन दिवसांत यावर आपणास कळेल, असेही मुख्यमंत्री शेवटी म्हणाले. Uddhav Thackeray | 'थिल्लर' गोष्टींकडे बघण्यास वेळ नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे