धुळ्याच्या बोरांना देशाच्या कानाकोपऱ्यात मागणी
महाराष्ट्र राज्यापेक्षा देशातील कानाकोप-यात म्हणजेच गुजरात, कलकत्ता, पटना, सुरत, दिल्ली याप्रमाणे देशातील कानाकोपऱ्यात महत्त्वाच्या ठिकाणी धुळ्यातील उमरान जातीच्या बोरांना मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे
धुळे : धुळ्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत भाजीपाला व इतर पिक आपल्या शेतात न घेता बोर उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याचे दिसून येत आहे. धुळ्यातील बोरांना देशातील कानाकोप-यात मागणी देखील वाढली आहे. मागणीप्रमाणे धुळ्यातील शेतकरी देशाच्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात बोरांचा पुरवठा देखील करीत आहेत.
धुळ्यातील गोविंदा लोटन माळी या शेतकऱ्याने पारंपारिक शेती पद्धतीला फाटा देत आपल्या साडेचौदा एकर शेतामध्ये उमरान जातीच्या बोरांच्या पिकाची लागवड केली आहे. दिवसाला तब्बल तीन टन इतका माल काढला जातो. महाराष्ट्र राज्यापेक्षा देशातील कानाकोप-यात म्हणजेच गुजरात, कलकत्ता, पटना, सुरत, दिल्ली याप्रमाणे देशातील कानाकोपऱ्यात महत्त्वाच्या ठिकाणी धुळ्यातील उमरान जातीच्या बोरांना मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. मागणीप्रमाणे धुळ्यातील बोर देशाच्या कानाकोपऱ्यात गोविंद माळी हे पोहोचवत असतात.
आठ रुपये किलो प्रमाणे धुळ्यातील बोरांना राज्याच्या बाहेर भाव दिला जातो. परंतु देशाच्या कानाकोपर्यात मागणी वाढत असताना मात्र महाराष्ट्र राज्यातच त्यांना भाव मिळत नाही. त्यामुळे नाइलाजाने गोविंद माळी यांना आपली बोर राज्याच्या बाहेर पाठवावी लागतात. बाहेरील राज्यांमध्ये देखील मिळणारा भाव हा जेमतेमच असून शेतकरी गोविंदा माळी यांना सर्व खर्च वजा जाता 14 रुपये किलो भाव अपेक्षित आहे. परंतु बाहेर राज्यांमध्ये देखील आपला माल पाठवून 8 रुपयापेक्षा जास्त भाव मिळत नाही.
त्यातच धुळ्यात सध्या हवामान बदलाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसत असून गोविंद माळी यांना देखील हवामान बदलाचा खूपच फटका बसला आहे. त्यात काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या संकट काळात सर्व बाजारपेठा व आयात निर्यात बंद करण्यात आली होती. त्याचा देखील फटका धुळ्यातील बोर उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच बसला आहे. असे असले तरी पारंपरिक पद्धतीला फाटा देत गोविंद माळी या शेतकऱ्याने आपल्या साडेचौदा एकर क्षेत्रामध्ये बोरीची लागवड केली असून त्यातून भरघोस उत्पन्न ते घेत आहेत.