Breaking News LIVE Updates : मुंबई: कांदिवलीतील इमारतीला आग; दोघांचा मृत्यू
Breaking News LIVE Updates, November 06 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE

Background
मुंबई: कांदिवलीतील इमारतीला आग; दोघांचा मृत्यू
मुंबईतील कांदिवली येथील हन्सा हेरिटेज इमारतीला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. शनिवारी रात्री इमारतीला आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
अनिल देशमुख अद्याप सेशन कोर्टात, आरटीपीसीआर रिपोर्ट अद्याप आला नाही
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अजूनही सेशन कोर्टातच..
त्यांची आरटीपीसीआर रिपोर्ट अजूनही आलेली नाही
आरटीपीसीआर रिपोर्ट आल्यानंतर निश्चित होणार त्यानां कुठ ठेवला जाणार
रिपोर्ट येण्यास उशिरा होणार असल्याची सुत्रांची माहिती
पीएमएलए कोर्टानी अनिल देशमुख यांना न्यायलयीन कोठड़ीत पाठविण्याचा आदेश दिला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मनी लॉंड्रिंगप्रकरणी अनिल देशमुखांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला. आणखी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार. ऋषीकेश देशमुख यांची जामिनाकरिता न्यायालयात धाव.
ब्रेक फेल झाल्याने ट्रक 50 फूट दरीत कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही
ब्रेक फेल झाल्याने ट्रक 50 फूट दरीत कोसळला, दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अहमदनगर : जिल्हा शासकीय रुग्णालयातील ICU विभागाला लागली आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
अहमदनगर : जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागली आग, रुग्णालयातील ICU विभागाला लागली आग, आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आग आटोक्यात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

