एक्स्प्लोर

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर; निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपची चाणक्यनीती?

Amit Shah in Maharashtra: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

Maharashtra Politics नागपूर :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah )हे आजपासून दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या  (State Legislative Assembly Election 2024) अनुषंगाने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, भाजपच्या आढावा बैठकीसाठी आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपराजधानी नागपुरात (Nagpur) येत आहे. दुपारी दोन वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर अमित शहा लगेचच शहरातील सुरेश भट सभागृहात भाजपच्या विदर्भ आढावा बैठकीसाठी पोहोचतील.

या बैठकीत अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भातील सर्व 62 मतदारसंघातील प्रमुख पंधराशे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात भाजपचे शहर अध्यक्ष जितेंद्र कुकडे यांनी माहिती दिली आहे. 

अमित शहा यांचा विदर्भ दौऱ्याला विशेष महत्त्व 

गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजपला अपेक्षेप्रमाणे कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पाहता कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्यासाठी आणि नव्या दमाने काम करण्यासाठी अमित शहा यांचा विदर्भ दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तर विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भात भाजपचा ग्राफ सतत खाली येत आहे. 2014 मध्ये विधानसभेत 44 जागा तर 2019 मध्ये 29 जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यामुळे आता 2024 मध्ये विदर्भातून भाजपच्या जागा वाढवण्यासाठी अमित शाह पक्षाच्या रणनीतीचा आढावा घेतील. अशी शक्यता आहे. या बैठकीत विधानसभा संयोजक, विधानसभा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, आजी-माजी आमदार यांसह प्रमुख पदाधिकारी या बैठकीत असणार आहे. सुमारे 1500 पदाधिकारी या बैठकीत असणार आहे. दरम्यान, नागपूर, पोलिसांनीही अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख बंदोबस्त लावला आहे. सुरेश भट सभागृह तसेच विमानतळापासून भट सभागृह पर्यंतचा मार्ग या सर्वच ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

दौऱ्याआधी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून २४ आणि २५ सप्टेंबर या दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या महत्तवपूर्ण नेत्यांची कोअर कमिठीची बैठक संपन्न झाली. या कोअर कमिटीच्या बैठकीत विधानसभेचे उमेदवार आणि जागावाटपाचा संदर्भात चर्चा झालीय. हा चर्चेचा अहवाल आज अमित शहायांच्या समोर मांडण्यात येईल. अशी माहिती आहे. ही बैठक काल सोमवारच्या रात्रीच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पार पडल्याचीही माहिती पुढे आली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
MLA Prakash Awade Joins BJP : आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
Sharad pawar: मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaAmit Shah Maharashtra Vidhan Sabha : विधानसभेसाठी अमित शाहांचं 'मिशन महाराष्ट्र' जागावाटपाबाबत लवकरच दिल्लीत बैठकABP Majha Headlines : 07 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सHC on Mumbai Police : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
MLA Prakash Awade Joins BJP : आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
Sharad pawar: मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Latur : आम्हाला फक्त शिकवू द्या! लातुरात हजारो शिक्षक कर्मचारी एकवटले, आक्रोश मोर्चासाठी सामूहिक रजा
आम्हाला फक्त शिकवू द्या! लातुरात हजारो शिक्षक कर्मचारी एकवटले, आक्रोश मोर्चासाठी सामूहिक रजा
Rahul Gandhi In Kolhapur : हरियाणातील मतदान संपताच राहुल गांधी थेट कोल्हापुरात; भेटीगाठीचा कार्यक्रम सुद्धा ठरला!
हरियाणातील मतदान संपताच राहुल गांधी थेट कोल्हापुरात; भेटीगाठीचा कार्यक्रम सुद्धा ठरला!
Embed widget