एक्स्प्लोर

Loudspeaker Controversy : राज ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणून प्रियांका चतुर्वेदींकडून लाव रे 'तो' बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ! काय आहे व्हिडीओमध्ये?

Maharashtra Loudspeaker Controversy : बाळासाहेबांच्या 'या' व्हिडिओतून प्रियांका चतुर्वेदींनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Loudspeaker Controversy : महाराष्ट्रात हनुमान चालीसा तसेच लाऊडस्पीकरचा वाद सुरू आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे या वादावरून आमने-सामने आले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत नुकताच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता, ज्यामध्ये बाळासाहेब म्हणतात की, ज्या दिवशी त्यांचा पक्ष सत्तेवर येईल, त्या दिवशी त्यांनी रस्त्यावर नमाज अदा करणे बंद करण्यासोबतच मशिदीतून लाऊडस्पीकर काढले जातील. आता राज ठाकरेंच्या या व्हिडिओला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बाळासाहेबांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

काय आहे बाळासाहेबांच्या 'या' व्हिडिओमध्ये?

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना प्रियांका चतुर्वेदी यांनी लिहिले की, “हा मूळ व्हिडिओ आहे. हे स्वस्तात नकल करणाऱ्यांसाठी एक धडा आहे. कॉपी करणारे नेहमीच एक पाऊल मागे नसून अनेक पावले मागे असतात. व्हिडीओमध्ये बाळासाहेब म्हणत आहेत की, मला कोणीतरी माझ्या स्टाइलमध्ये बोलत असल्याचे सांगण्यात आले. तुमचा शैली ठीक आहे, पण तशा पद्धतीची तुमची विचारधारा आहे का? नुसती मराठी-मराठी बोंब मारून चालणार नाही. तुमच्या जन्माआधी मी महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा मांडला होता. प्रियांका चतुर्वेदी या बाळासाहेबांच्या या व्हिडिओतून राज ठाकरेंना निशाणा साधताना दिसल्या. दरम्यान, राज ठाकरेंची भाषण करण्याची शैली बाळासाहेबांसारखीच असल्याचं बोललं जातंय. प्रियंका चतुर्वेदीने याबाबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडिओत काय आहे?
राज ठाकरे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या 36 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भगवी शाल परिधान केलेले दिसत आहेत आणि त्यांच्या मागे पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे बोलताना दिसत आहेत, "ज्या दिवशी माझे सरकार स्थापन होईल, तेव्हा रस्त्यातील नमाज थांबवली जातील, कारण धर्म असा असावा की, त्यामुळे देशाच्या विकासात अडथळा येणार नाही. जर आपला हिंदू धर्म अडथळा निर्माण करत असेल तर मला सांगा. मी याकडे लक्ष देईन. मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले जातील.

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांविना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याबाबत आवाज उठविल्यानंतर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. कुर्ला येथील एससीएलआर जवळील विभागात तीन ते चार मोठ्या मशिदी आहेत. त्यामुळे इथे पहाटे 6 च्या आधीच मोठ्या आवाजात अजान होत असे. मात्र, आज या विभागात नमाज पठण झाले. पण लाउडस्पीकरवर अजान झाली नाही. दरम्यान, मुंबईमधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टींनी एकत्र येत पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या

Loudspeaker News : मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अजान भोंग्यांशिवाय, पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा काही ट्रस्टींचा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vs Sharad Pawar | संजय राऊतांची कोणती भूमिका पवारांना अमान्य? Rajkiy SholeDeva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारीWadettiwar On Narendra Maharaj:नरेंद्र महाराजांवर टीका अनुयायांच्या रडारवर वडेट्टीवार Special ReportZero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.