एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2022 : संत गजानन महाराजांची पालखी आज ऊळे मुक्कामी; तर रूक्मिणी मातेच्या पालखीचा खांडवी येथे मुक्काम

Ashadhi Wari 2022 : मागच्या तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच रिंगण सोहळा अनुभवण्याची संधी गावकऱ्यांना मिळाल्याने पंचक्रोशीतील लोक सकाळपासूनच गर्दी करून या ठिकाणी बसले होते.

Ashadhi Wari 2022 : कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 6 जूनला गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं. तर, 3 जूनला संत मुक्ताईचा आणि रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा सुरु झाला. निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळाही 13 जूनला झाला. हरिनामाचा गजर करीत पालखीचा हा मुक्काम आज नेमका कुठे असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज ऊळे येथे मुक्काम 

शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे. 6 जूनला शेगाव येथून ही पालखी निघाली. भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखीचा आजचा मुक्काम ऊळे या ठिकाणी असणार आहे. उद्या पालखी ऊळे येथून प्रस्थान करेल तर रात्री पालखीचा मुक्काम सोलापूर येथे असणार आहे. 

माता रूक्मिणीच्या पालखीचा आज खंडेश्वर मंदिर, खांडवी येथे मुक्काम 

माता रूक्मिणीच्या पालखीची सुरुवात 3 जून रोजी सुरु झाली. हा पालखी सोहळा कौंडण्यपूर येथून प्रस्थान करण्यात आला. त्यानुसार आज रात्री खंडेश्वर मंदिर, खांडवी येथे मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच रविवारी 3 जुलै रोजी ही पालखी सकाळी खंडेश्वर मंदिर, खांडवी, येथून प्रस्थान करेल. तर, रात्री जगदंबा मंदिर, माढा, जिल्हा सोलापूर येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. 

संत मुक्ताईच्या पालखीचा आज शेंद्री येथे मुक्काम

यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनपासून प्रस्थान झाले. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजेच समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला आहे. त्यानुसार आज पालखी शेंद्री मुक्कामी असणार आहे. उद्या म्हणजेच रविवारी 3 जुलै रोजी ही पालखी वडसिंगे येथे प्रस्थान करेल, तर रात्रीचा मुक्काम माढा या ठिकाणी असणार आहे. 

संत निवृत्तीनाथ पालखीचा आज रावगांव येथे मुक्काम 

संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळा 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी निघाला. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी आज रावगांव मुक्कामी असणार आहे. तर, उद्या म्हणजेच 3 जुलै रोजी पालखी सकाळी रावगांव येथून प्रस्थान करेल. त्यानंतर रात्री जेऊर येथे पालखीचा रात्रभर मुक्काम असणार आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मनसोक्त विठुरायाचे दर्शन पाहता येणार आहे. 

संत नामदेवांच्या पालखीचा आज दगड धानोरा येथे मुक्काम 

दोन वर्षांनंतर पालखीच्या सोहळ्याने अवघी पंढरी पुन्हा एकदा दुमदुमली आहे. भागवत धर्माची पताका सातासमुद्रापार पोहोचविणारे संत नामदेव महाराज (Sant Namdeo Maharaj) यांची पालखी 19 जून रोजी नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे रवाना झाली. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी ही पालखी पंढरपूरला शेकडो वारकऱ्यांसह पायी प्रवास करत असते. मानाच्या पालख्यांपैकी एक म्हणून नरसी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या पालखीला विशेष महत्त्व आहे. पालखीचा आजचा मुक्काम दगड धानोरा येथे असणार आहे तर, उद्या म्हणजेच 3 जुलै रोजी पालखी दगड धानोरा येथून प्रस्थान करेल तर पालखीचा रात्रीचा मुक्काम खांडवी येथे असणार आहे.   

संत तुकारामांच्या पालखीचा आज इंदापूर येथे मुक्काम

विठूनामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निघाला आहे त्यामुळे वारकऱ्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत तुकारामांच्या पालखीचा आज इंदापूर येथे मुक्काम असणार आहे. तर, उद्याचा संपूर्ण दिवस पालखीचा मुक्काम इंदापुरात असणार आहे.     

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज विमानतळ फलटण येथे मुक्काम 

विठूनामाच्या गजरात 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देहू आळंदीहून प्रस्थान करण्यात आले. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील अनेक पालख्या पायी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने निगाल्या आहेतत. त्यानुसार पालखीचा आजचा मुक्काम विमानतळ फलटण येथे असणार आहे. तर, उद्या पालखी फलटण येथून प्रस्थान करेल. तर, रात्रीचा मुक्काम बरड या ठिकाणी असणार आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
Embed widget