Ashadhi Wari : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज भवानी पेठ मुक्कामी; तर तुकोबारायांच्या पालखीचा निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम
Ashadhi Wari : टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम कुठे ते जाणून घ्या.
![Ashadhi Wari : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज भवानी पेठ मुक्कामी; तर तुकोबारायांच्या पालखीचा निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम ashadhi wari 2022 ashadhi ekadashi pandharpur sant dnyaneshwar palkhi stays at bhawani peth and sant tukaram maharaj palkhi stays at nivdunga vithoba temple Ashadhi Wari : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज भवानी पेठ मुक्कामी; तर तुकोबारायांच्या पालखीचा निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/23/ee2f1f5819900998588327ca5c3b663b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ashadhi Wari : दोन वर्षांच्या कालावधीनंतर अखेर आषाढी वारी पालखी सोहळा सुरु झाला. 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सुरु झालेला मुक्काम आज भवानी पेठेतील मंदिरात आहे तर 20 जूनला सुरु झालेला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज निवडुंगा विठोबा मंदिरात असणार आहे. टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले....'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर....करत पालखी पुण्यात प्रस्थान झाली.
संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालख्या पुण्यात मानाच्या मानल्या जातात. काल पालखीचे प्रस्थान पुण्यात झाले. तुकोबारायांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला अनेक दिग्गज मान्यवर दर्शन घेण्यास येतात. त्यानुसार, सामान्यांसोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) देखील उपस्थित होते. त्यानुसार संत तुकारामांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील मंदिरात आहे. या दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना प्रचंड गर्दी केली आहे.
यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात पुणेकर वारकऱ्यांसोबत दंग झालेले पाहायला मिळाले. वेगवेगळ्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करताना पुणेकर दिसतायेत पुण्यातील सगळ्यात पेठ परिसरात अनेक ठिकाणी वारकऱ्यांचा विसावा आहे. तब्बल दोन वर्षांनंतर हा पालखी सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यात सध्या भक्तीमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या :
- Ashadhi Wari 2022: आषाढी वारी बद्दल माहिती हवी आहे डाऊनलोड करा 'हे' ॲप
- Ashadhi Wari 2022: वारीत होणार संविधानाचा जागर, माऊलींच्या पालखीसोबत संविधानाच्या दिंडीचे होणार प्रस्थान
- Ashadhi Wari 2022 : 'माऊली, माऊली' च्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
- Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान, इंद्रायणी काठ वारकऱ्यांनी गजबजला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)