ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2025 | रविवार
1. महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या तयारीचा आजच्या बैठकीत श्रीगणेशा, मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडेंकडे, अमित ठाकरेंकडे सर्व शाखाध्यक्ष आणि गट अध्यक्षांची जबाबदारी https://tinyurl.com/ydmy94f7 मनसेचे मिशन महापालिका सुरू, अध्यक्षपद मिळताच संदीप देशपांडेंनी मुंबई महापालिकेसाठी रणशिंग फुंकलं https://tinyurl.com/59bxux26
2. एका खोक्या भाईचं काय घेऊन बसलात, विधानसभेत सगळे खोक्या भाई बसलेत, राज्यातील राजकीय परिस्थितीवरुन राज ठाकरेंचा सरकारला टोला https://tinyurl.com/3zvwk9nz
3. नागपूरच्या हिंसाचारग्रस्त भागातील संचारबंदी पूर्णपणे उठवली, सहा दिवसांनी संचारबंदी पूर्णत: मागे घेण्याचा निर्णय, पोलिस बंदोबस्त मात्र कायम राहणार https://tinyurl.com/4u57tjbj
4. लाडक्या बहिणींना 2100 द्यायचे आहेत, पण पैशाचं सोंग आणता येत नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती, 2100 रुपयांसाठी लाडक्या बहिणींना अजूनही वाट पाहावी लागणार असल्याचे संकेत https://tinyurl.com/2fmkk4xd
5. सव्वाशेपेक्षा जास्त आमदार असलेल्या भाजपची आमदारांची भूक वाढतच आहे, छगन भुजबळाचं निरीक्षण, पक्ष एक नंबरचा करायचा तर काही चुकीच्या गोष्टी टाळण्याचाही भुजबळांचा सल्ला https://tinyurl.com/cbe87b6k
6. नाशिक-रायगड पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसाचं स्पष्टीकरण, जिल्ह्यांचा पालकमंत्री जाहीर होत नाही, तोवर मुख्यमंत्र्यांकडेच जबाबदारी, लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा करण्याचं आश्वासन https://tinyurl.com/3cn4rdwd
7. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी खास कायदा करुन मेळा प्राधीकरण स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाशिकमध्ये माहिती, पाणी स्वच्छ करण्यासाठी 1200 कोटी रुपये खर्च करणार https://tinyurl.com/yur2ccs4
8. भान विसरून ती समुद्राकडे पाहत राहिली, पण एका लाटेने होत्याचं नव्हतं झालं, रायगडच्या हरिहरेश्वर समुद्राने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महिलेला केलं गिळंकृत https://tinyurl.com/ycyu8xvb
9. न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घरी सापडलेल्या पैशांचा पोलिसांनी दिलेला व्हिडीओ सुप्रीम कोर्टाकडून पब्लिक प्लॅटफॉर्मवर, न्यायमूर्ती वर्मांना मोबाईलमधला कोणताच डेटा डिलीट न करण्याचे निर्देश https://tinyurl.com/sv88tdf4 न्यायमूर्ती वर्मांनी स्वतःहून राजीनामा द्यावा किंवा संसदेनं कारवाई करावी, ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांचं मत, जळालेल्या नोटांचे व्हिडिओ वेबसाईटवर टाकल्याबद्धल सुप्रीम कोर्टाचंही केलं अभिनंदन https://tinyurl.com/323fxwm8
10. एकूण 34 चौकार, 12 गगनचुंबी षटकार अन् 286 धावा, आधी ट्रॅव्हिस हेडने चोपलं, मग इशान किशनने ठोकलं, सनरायझर्स हैदराबादचे राजस्थान रॉयल्ससमोर तगडं आव्हान https://tinyurl.com/ycy9vu9m BCCIने तिन्ही फॉरमॅटमधून दाखवला बाहेरचा रस्ता! हैदराबादमध्ये येताच पहिल्या सामन्यात इशान किशनने ठोकले तुफानी शतक https://tinyurl.com/2bxf6d44
एबीपी माझा स्पेशल
पाणी फाऊंडेशनचं तुफान महाराष्ट्रभर पुन्हा येणार, आमिर खानची घोषणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ https://tinyurl.com/5429epar
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

