एक्स्प्लोर

31 December Headlines : सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत, मंदिरं, पर्यटनस्थळांवर गर्दी, आज दिवसभरात 

31 December Headlines : आज 2022 चा अखेरचा दिवस आहे. देशभरात नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापुरुषांच्या सन्मानार्थ यात्रेचा समारोप होणार आहे. 

31 December Headlines : आज 2022 चा अखेरचा दिवस आहे. देशभरात नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे. नववर्षाच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी बाजारपेठा सजल्या आहेत. सोबतच मुंबईतील पर्यटन स्थळेही नटली आहेत. मुंबईत वर्षाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात पर्यटन दाखल झालेत. त्यानिमित्तानं बेस्टकडून गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळी अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापुरुषांच्या सन्मानार्थ यात्रेचा समारोप होणार आहे. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर 
 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दिवंगत विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये येणार आहेत. सकाळी व्यसनमुक्ती रॅलीचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होईल.   

अकोल्यात 'महाबीज'ची वार्षिक आमसभा
आज 'महाबीज'ची वार्षिक आमसभा आहे. यात संचालक, लाभधारक शेतकरी उपस्थित राहतील. गेल्या वर्षभरात खरीपात महाबीज बियाण्यांचे वाढलेले भाव यावरून लाभधारक शेतकरी आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. महाबीजचे अध्यक्ष आणि राज्याच्या कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले या आमसभेला उपस्थित असणार आहेत.   
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापुरुषांच्या सन्मानार्थ यात्रेचा समारोप 
राष्ट्रवादी काँग्रेस कडून महापुरुषांच्या सन्मानार्थ निघालेल्या यात्रेचा आज जिल्ह्यातील देऊळगाव येथे समारोप आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आ.अमोल मिटकरी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे.

सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत
आज 2022 चा अखेरचा दिवस आहे. देशभरात नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे. थर्टीफर्स्टच्या निमित्ताने पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला असते. गोव्यात दरवर्षी थर्टीफर्स्टचा माहौल असतो. यंदा देखील पर्यट गोव्यात पोहोचले आहेत. याबरोबरच मुंबईत न्यू इअर सिलिब्रेशनसाठी  सर्वच हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, नाइट क्लबमध्ये कुठलेही निर्बंध नसल्याने मोठी गर्दी अगदी पहाटे पर्यंत पाहायला मिळणार आहे. यासाठी हॉटेल मालकांनी सुद्धा विशेष तयारी केलीय.
  
मुंबईत स्थळी अतिरिक्त गाड्या 
नववर्षाच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी बाजारपेठा सजल्या आहेत. सोबतच मुंबईतील पर्यटन स्थळेही नटली आहेत. मुंबईत वर्षाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात पर्यटन दाखल झालेत. त्यानिमित्तानं बेस्टकडून गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळी अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत. 

पुण्यात पोलिसांकडून वाहनांची तपासणी
ड्रंक आणि ड्राईव्ह रोखण्यासाठी ब्रेथ अनालायझर  द्वारा प्रत्येक वाहन चालकांची पोलिसांकडून तपासणी होणार आहे. कोरोना विषाणूचा धोका पाहता पुणे पोलिसांकडून युज अँड थ्रो पाईपचा होणार वापर. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सोबत वाहन जप्तीची येऊ शकते.  
 
नागपुरात विशेष बंदोबस्त 
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांनी गुन्हेगारीच्या संभाव्य घटना आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी विशेष बंदोबस्त लावण्याचे नियोजन केले आहे. तसेच मद्य विक्री संदर्भातही पोलिसांचा वॉच असणार आहे..
  
मंदिरं, पर्यटनस्थळांवर तुफान गर्दी 
नव्या वर्षाच्या निमित्ताने मंदिरं आणि पर्यटनस्थळी मोठी गर्दी झाली आहे. साई बाबांच्या दर्शनासाठी भाविक हजरोंच्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. याबरोबरच सरत्या वर्षाला विठ्ठल दर्शनाने निरोप देण्यासाठी हजारो भाविक आणि पर्यटक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Navneet Rana Special Report : महायुतीतल्या नाराजीचं नवनीत राणांसमोर मोठं आव्हानRajan Vichare Lok Sabha Elections : शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजन विचारेंनी फोडला प्रचाराचा नारळRahul Shewale on Lok Sabha Election : ठाकरेंच्या अनिल देसाईंविरोधात शिवसेनेकडून राहुल शेवाळे मैदानातMVA Meeting for Seating Sharing : मविआच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? जागावाटपाचा तिढा सुटला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Embed widget