एक्स्प्लोर

Kolhapur : श्रेयवादाची राजकीय लढाई थांबवून गुदमरलेल्या कोल्हापूरचा श्वास पहिल्यांदा मोकळा करा!

चारी बाजूने कोंडी झाल्याने कोल्हापूर शहराची पूर्णत: वाताहत झाली आहे. अनेक नागरी समस्या गेल्या दशकांपासून प्रलंबित आहेत. स्वत:चा टापू सांभाळण्याच्या नादात कोल्हापूरची अवस्था सध्या तोळामासाची झाली आहे.

Kolhapur News : राज्याला पुरोगामी विचारांना दिशा देणारा, सामाजिक बदलांच्या नांदीची मुहूर्तमेढ रोवणारा, पर्यटनाची राजधानी म्हणून कोल्हापूर जिल्हा राज्यात नव्हे, तर देशात ओळखला जातो. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणांचाच उपभोग त्यांच्या पश्चात गेल्या शतकोत्तर कालावधीपासून घेतला जात आहे. मात्र, स्वार्थी राजकारणाने स्वत:चा टापू सांभाळण्याच्या नादात कोल्हापूरची अवस्था सध्या तोळामासाची झाली आहे.

चारी बाजूने कोंडी झाल्याने कोल्हापूर शहराची पूर्णत: वाताहत झाली आहे. कोल्हापूर शहराच्या अनेक नागरी समस्या गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित आहेत. त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. कोल्हापूर शहरामध्ये प्रवेश करताच घरी सुरक्षित परत जाता येईल, की नाही? याबाबत कोणतीही श्वाश्वती देता येत नाही इतकी विदारक अवस्था झाली आहे. 

कोल्हापूर शहरातील रस्त्यांनी पार लाज काढली

कोल्हापूर शहरात प्रवेश करताना शाहू नाका ते सायबर चौकापर्यंत तसेच हाॅकी स्टेडियम ते सायबर चौकापर्यंत तसेच आर. के. नगर चौक ते शांतीनिकेतनपर्यंत हा अपवाद सोडल्यास कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत विदारक आहे. शहरातंर्गत एकही रस्ता शोधून सापडत नाही ज्या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य नाही. सायबर चौकाकडून राजारामपूरीकडे येताना, तर जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. गेल्या पाच वर्षांपासून त्या रस्त्याला डांबर मिळालेलं नाही. कोल्हापूर शहरातील रस्त्यांबरोबरच गल्लीबोळ सुद्धा खड्ड्यांनी भरून गेले आहेत. 

शहरातील अंतर्गत रस्ते घुशीने शेत पोखरावे, त्या पद्धतीने खड़्ड्यांनी पोखरले गेले आहेत. त्यामध्येही ऐन पावसाळ्यात मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रकार म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असा प्रकार झाला आहे. खड्ड्यांचा आकारच इतका मोठा आहे, की त्यात मुरुम टाकल्यानंतर पाऊस पडला की, चिखलाचे साम्राज्य तयार होते. भरीत भर म्हणजे रस्ता केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खोदायचा हा पराक्रम, फक्त कोल्हापूर मनपाच करू शकते. 

वाहतूक कोंडी नित्याचीच

मुळातच कोल्हापूर शहरातील रस्ते अतिशय चिंचोळे आहेत. त्यात त्यांची खड्ड्यांनी पार चाळण करून टाकली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. भाऊसिंगजी रोडवरील भाऊगर्दी, तर दररोज अपघाताला निमंत्रण देणारी आहे. त्यामुळे या मार्गावरील महापालिकेनजीक उड्डाणपूल तसेच शासकीय कार्यालयांचे विकेंद्रीकरण ही काळाची गरज आहे. करवीर पोलिस स्टेशनला सोयीस्कर अशी पर्यायी जागा दिल्यास निश्चित या रस्त्यावरील ताण कमी होऊ शकतो.  

शहरातील सिग्नल यंत्रणाही मोडकळीला आली आहे. त्यात सिग्नल पाळणे कोल्हापूरकरांच्या नियमात नसल्याने वाहतुक कोंडीला अधिक हातभार लागत आहे. कोल्हापूर पोलिसांकडून लावण्यात आलेले सीसीटीव्ही सुद्धा धूळ खात पडले आहेत. उपनगरातील कॅमेऱ्यांची सुद्धा तीच अवस्था झाली आहे. त्यामुळे चोऱ्यामाऱ्या राजरोस घडत आहेत. 

हद्दवाढीचा मुद्दा गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित

कोल्हापूर नगरपालिकेची महानगरपालिका 1972 झाली असली, तरी तेव्हापासून हद्दवाढ झालेली नाही. केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थापोटी आजपर्यंत शहराची हद्दवाढ होऊ शकलेली नाही. हद्दवाढीवरून दोन गट पडले असले, तरी शहरानजीकच्या गावांची सामूहिकपणे समजूत काढण्याची कोणत्याही राजकीय नेतृत्वाने प्रगल्भता दाखवलेली नाही. शहराची वाढ खुंटल्याने राज्यासह केंद्राच्या कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही ही साधी बाबही आजपर्यंत लक्षात घेतलेली नाही. फक्त मतदारसंघातील आडाख्याने राजकीय भूमिका घ्यायची आणि शहरात येऊन राजकारण करायचे असा पायंडा पाडला गेला आहे. कोल्हापूर शहरात टुमदार बंगले बांधायचे आणि गावात जाऊन विरोधात बसायचे असाही सर्रास प्रकार सुरु आहे. 

आता पुन्हा हद्दवाढीच्या मुद्याने उचल खाल्ली आहे. नगरविकास विभागाकडून हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिल्यानंतर पुन्हा एकदा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कोल्हापूर मनपा प्रशासनाने फेब्रुवारी 2021 मध्ये 18 गावे व दोन एमआयडीसींसह पाठवलेला प्रस्ताव, तसेच 1972 नंतर आजतागायत शहराची हद्दवाढ झाली नसल्याची 81 सदस्य संख्येची माहिती शासनाला सादर करण्यात आली आहे. 

मनपा प्रशासनाने 2013 पासून 2021 पर्यंत आता 4 वेळा, तर आतापर्यंत 6 प्रस्ताव पाठवले आहेत. महापालिकेने 17 गावांचा समावेश करून राज्य शासनाकडे 2014 मध्ये प्रस्ताव सादर केला होता; पण सरकारकडून 2017 मध्ये 42 गावांचा समावेश असलेल्या प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे शहराची हद्दवाढ पुन्हा थांबली होती. त्यानंतर 2021 मध्ये महापालिकेने नवीन प्रस्ताव सादर केला होता.  

हद्दवाढ झाल्यास विकासाची कोंडी फुटेल 

कोल्हापूरच्या राजकीय पाठबळासह जनरेठ्याची गरज आहे. शहराची लोकसंख्या हद्दवाढीनंतर 10 लाखांच्या घरात गेल्यास निश्चितच केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ सर्वसामान्यांच्या दारी पोहोचवण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व निवडणूका पुढील चार महिन्यांसाठी पुढे ढकलल्या गेल्या आहेत. त्यामुळे या कालावधीत सामूहिक रेटा वाढवून हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लागू शकतो. 

जी चूक कोल्हापूरसाठी झाली तीच इचलकरंजीबाबत 

कोल्हापूरच्या हद्दवाढीचा मुद्दा गाजत असताना इचलकरंजी नगरपालिका महानगरपालिका झाली आहे. मात्र, इचलकरंजीला मनपा दर्ज मिळाला आहे. मात्र, कोणतीही हद्दवाढ न करता मनपा दर्जा दिल्याने भविष्यातही जी अवस्था कोल्हापूरच मनपाची आहे तीच अवस्था इचलकरंजी मनपाची होऊ शकते. त्यामुळे स्वतंत्र तालुका होण्याआधी हद्दवाढ केल्यास इचलकरंजी मनपाच्या महसूलात नक्कीच वाढ होऊ शकते.  

कोल्हापूरला कोकणला रेल्वेला जोडण्याचा मुद्दाही हवेतच 

कोल्हापूर ते वैभववाडी या 103 किमी रेल्वेमार्गाची चर्चा होऊन पुढे काहीच प्रगती झालेली नाही. हा मार्ग पुर्णत्वास गेल्यास कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र कोकणशी जोडला जाणार आहे. तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यासंदर्भात पाहणी सुद्धा केली होती. त्यानंतर या प्रश्नावर कोणताही हालचाल झालेली नाही.

खंडपीठासाठी सुद्धा लढा सुरुच  

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील पक्षकार तसेच वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. या लढ्यासाठी सुद्धा राजकीय पाठबळाची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीही याबाबतीत सकारात्मक आहेत. त्यामुळे विद्यमान सरकारने हा मुद्दा राज्यपालांना सादर करून हा प्रस्ताव केंद्राकडे सादर करणे आवश्यक आहे.  

पन्हाळा, विशाळगड शेवटच्या घटका मोजतोय

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळगड आणि विशाळगडावरील ढासळत असलेली चिरेबंदी निश्चित काळजाला घरं पाडणारी आहे. पन्हाळा गेल्या तीन वर्षांपासून ढासळत आहे. विशाळगडावरही यंदा चिरेबंदी ढासळली. त्यामुळे पत्रकबाजी आणि किरकोळ डागडूजी न करता या किल्ल्यांचे जतन पूर्ण क्षमतेनं करण्याची गरज निर्माण झाली आहे. पन्हाळगडच्या मुख्य मार्गावर वारंवार होणारी पडझड पाहता पर्यायी पुलाची सुद्धा चाचपणी करता येते का? हे पाहण्याची आवश्यकता आहे. 

शाहू स्मारक हवेतच, शाहू समाधीस्थळाचे कामही रखडले

कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या 27 एकरावरील शाहू मिलचा पाया शाहू महाराजांनी रचला होता. त्याच शाहू मिलचा भोंगा दोन दशकांपूर्वी बंद पडला आहे. राजर्षी शाहूंच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त शाहू मिलचे वैभव कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला अनुभवता आले. यासाठी नेटके नियोजन करण्यात आले होते. मात्र, याच जागेवरील शाहू स्मारक अजूनही प्रलंबित आहे. दुसरीकडे शाहू समाधीस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांसाठी निधी प्राप्त झाला होता. सामाजिक न्याय विभागाकडून निधी प्राप्त झाला होता. मात्र, विद्यमान राज्य सरकारकडून स्थगिती दिल्याने काम पुन्हा एकदा रखडले आहे. 

थेट पाईपलाईनही अनेक वर्षापासून रखडली आहे. दिवाळीपर्यंत काम पूर्ण होईल, अशी आशा असली, तरी प्रत्यक्षात 2023 उजाडेल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे याचा पुन्हा एकदा फुटबाॅल होऊ नये, यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. 

पोलिस आयुक्तालय, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या समस्या, फौंड्री क्लस्टर, गारमेंट क्लस्टर, पंचगंगा प्रदुषण, पुण्या मुंबईची मर्यादा लक्षात घेऊन आयटी हबसाठी असलेल्या चांगली संधीचे सुद्धा सोने करता आलेलं नाही. त्यामुळे कोल्हापूरचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी आता जिल्ह्यातील राजकीय कारभाऱ्यांनी  राजकीय मतभेद बाजूला एकत्र येण्याची गरज आहे. त्याशिवाय कोणताही उद्योजक किंवा उद्योग मोठी गुंतवणूक करण्यास धाडस करणार नाही यात शंका नाही. लढल्याशिवाय काही मिळत नाही, हा कोल्हापूरकरांचा इतिहास असला, तरी आता सामूहिकपणे लढण्याची गरज निर्माण झाली आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget