एक्स्प्लोर

शैक्षणिक संस्थांमधील जातीभेद गंभीर मुद्दा; यूजीसी कोणती पावले उचलणार? सुप्रीम कोर्टाची विचारणा

Supreme Court:  उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसोबत होत असलेला जातीय भेदभावावर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली.

Supreme Court:  शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसोबत होत असलेला जातीय भेदभाव (Caste Discrimination) हा गंभीर मुद्दा असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. अशा प्रकारचा भेदभाव संपवण्यासाठी कोणती पावले उचलली, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) विचारला. रोहित वेमुल्ला (Rohit Vemulla) आणि डॉ. पायल तडवी (Dr. Payal Tadvi) यांच्या आईंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर आज सुनावणी झाली. 

सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा आणि एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. हा अतिशय गंभीर मुद्दा असून काही चिंता व्यक्त केल्या जात आहेत. तुम्ही त्यास कसे सामोरे जाणार आहात आणि या जातीय भेदभावांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलली आहेत? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने केला. 

न्या, बोपण्णा यांनी म्हटले की, जातीय भेदभावांमुळे विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले. भविष्यात अशा घटना घडू नयेत, याकडे लक्ष  देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. 

ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. त्यांनी म्हटले की, याचिकाकर्त्यांनी आपला मुलगा आणि मुलगी गमावली आहे. मागील एका वर्षात जातीय भेदभावामुळे तीन विद्यार्थ्यांना प्राण गमावावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या याचिकेची निकड आहे.

अॅड. जयसिंग यांनी म्हटले की, शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या तक्रारी दूर करण्यासाठी 2012 मध्ये यूजीसीने तयार केलेले नियम पुरेसे नाहीत. POSH आणि अँटी-रॅगिंग नियमांशी तुलना करता यूजीसीचे नियम कठोर नाहीत असे दिसून येते. केंद्र सरकारला याबाबत 2019 मध्ये नोटीस जारी करण्यात आली होती, ही बाबदेखील त्यांनी खंडपीठासमोर लक्षात आणून दिली.  

सुप्रीम कोर्टाने यूजीसीला कठोर नियम, मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे निर्देश दिले तर या नियमांचे पालन करण्यास उच्च शिक्षण संस्थांना बंधनकारक केले जाऊ शकते, असा मुद्दाही अॅड. इंदिरा यांनी मांडला. 

या प्रकरणाची सुनावणी आता चार आठवड्यानंतर होणार आहे. 

17 जानेवारी 2016 रोजी हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठात पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुल्लाने आत्महत्या केली होती. मुंबईतील टीएन टोपीवाला मेडिकल कॉलेजमधील आदिवासी विद्यार्थिनी असलेल्या डॉ. पायल तडवी हिने 22 मे 2019 रोजी तिच्या संस्थेतील तीन डॉक्टरांकडून कथित जाती-आधारित भेदभावामुळे टोकाचे पाऊल उचलले होते. या प्रकरणांमुळे उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभावाचा मुद्दा गंभीरपणे अधोरेखित झाला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Wife Reaction : दोषी असतील तर कारवाई होईल, वाल्मिक कराडची पत्नी म्हणाली...Zero Hour Full | वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, इतक्यात तरी जामीन मिळणं अतिशय कठीणABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
Embed widget