एक्स्प्लोर

रामसेतूच्या अस्तित्वाचा अद्याप कोणताही ठोस पुरावा नाही, कारण...; केंद्र सरकारची संसदेत माहिती

NO Conclusive Proof of Ram Setu Govt Says in Parliament: सरकारने संसदेत म्हटलंय की, रामसेतूच्या अस्तित्वाचे कोणतेही ठोस पुरावे सध्या तरी सापडलेले नाहीत.

NO Conclusive Proof of Ram Setu Govt Says in Parliament: भारत (India News) आणि श्रीलंकादरम्यान (Shri Lanka News) समुद्रात बांधण्यात आलेल्या कथित रामसेतूच्या (Raam Setu) मुद्द्यावर गुरुवारी राज्यसभेत (Rajya Sabha) चर्चा झाली. याबाबत केंद्र सरकारनंही (Central Government) संसदेत उत्तर दिलं. रामसेतूच्या अस्तित्वाचे स्पष्ट पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, असं केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. प्राचीन द्वारका आणि अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत असल्याचं केंद्राच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

हरियाणाचे (Haryana) अपक्ष खासदार कार्तिकेय शर्मा (MP Kartikeya Sharma) यांनी राज्यसभेत विचारलं होतं की, आमच्या गौरवशाली इतिहासावर सरकार काही वैज्ञानिक संशोधन करतंय का? कारण आधीच्या सरकारनं या विषयाला महत्त्व दिलं नाही. कार्तिकेय शर्मा यांच्या या प्रश्नाला केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Union Minister Jitendra Singh) यांनी उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी रामसेतूच्या अस्तित्वासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. 

हा इतिहास 18 हजार वर्षांचा : जितेंद्र सिंह

जितेंद्र सिंह म्हणाले की, "आमच्या खासदारानं रामसेतूच्या मुद्द्यावर प्रश्न केला याचा मला आनंद आहे. पण हा 18000 वर्षांचा इतिहास आहे. अशा परिस्थितीत आपल्या काही मर्यादा आहेत. ते म्हणाले की, आपण ज्या पुलाबद्दल बोलतोय, तो 56 किलोमीटर लांब होता. स्पेस टेक्नोलॉजीमार्फत शोध घेतला त्यावेळी समुद्रात काही दगड दिसून आले. त्या दगडांची एक अशी आकृती आहे, जी त्यामध्ये सातत्य दाखवते. तसेच, समुद्रात काही बेटे आणि चुनखडीसारख्या गोष्टीही सापडल्या आहेत. स्पष्ट शब्दात सांगायचं तर रामसेतूचं खरं रूप तिथे आहे की नाही, हे सांगणं कठीण आहे. दरम्यान, अशी काही चिन्हं आहेत जी सूचित करतात की, तिथे एक रचना अस्तित्वात असू शकते.

रामसेतूच्या मुद्द्यावर काँग्रेसवर आरोप-प्रत्यारोप 

रामसेतूचे अस्तित्व मान्य नसल्याचा आरोप करत भाजप आतापर्यंत काँग्रेसवर सातत्यानं निशाणा साधत होती. मात्र आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत दिलेल्या उत्तरामुळे काँग्रेसला प्रत्युत्तराची संधी मिळाली आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी ट्विटरवर सरकारचे उत्तर शेअर केलं आणि लिहिलंय की, "सर्व भक्तांनो, उघड्या कानांनी ऐका आणि उघड्या डोळ्यांनी पाहा. मोदी सरकार संसदेत म्हणतंय की, राम सेतूच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही."

रामसेतू नेमका आहे कुठे?

भारतातील रामेश्वरम आणि मन्नार बेट यांच्यामध्ये चुनखडीच्या खडकांची साखळी आहे. भारतात ही साखळी रामसेतू म्हणून ओळखली जाते. या पुलाची लांबी सुमारे 30 मैल (48 किमी) इतकी आहे. या भागांत समुद्र खूप उथळ आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या बोटी आणि जहाजं चालविण्यात अडचणी येतात. सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी श्रीरामानं हा सेतू बांधला, असा दावा अनेक पौराणिक कथांमध्ये करण्यात आला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या वानरांच्या फौजेनं रावणाच्या लंकेत पोहोचण्यासाठी दगडांवर 'श्रीराम' नाव लिहून ते पाण्यात टाकले आणि ते दगड पाण्यावर तरंगले. मग वानरांनी सगळ्या दगडांवर श्रीराम लिहिलं, ते पाण्यात टाकले आणि लंकेपर्यंत जाण्यासाठी पूल बांधला, असा पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे. 1993 मध्ये, नासानं या रामसेतूची उपग्रह छायाचित्रं प्रसिद्ध केली होती, ज्यात त्याचं वर्णन मानवनिर्मित पूल म्हणून केलेलं होतं. दरम्यान, रामसेतूच्या मुद्द्यावरुन भारतात अनेकदा आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मुख्यमंत्र्यांच्या नातवाला पंतप्रधानांची टाळी! चिमुरड्या रुद्रांश शिंदेला मोदींनी खाऊही दिला अन्...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 26 February 2025 : ABP Majha : 7 PmABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 February 2025JOB Majha News : केंद्रीय औद्योगित सुरक्ष दलमध्ये नोकरीची संधी,  शैक्षणिक पात्रता काय? 26 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Embed widget