New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; 18 जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी, नेमकं काय घडलं?
New Delhi Railway Station Stampede: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. यासाठी देशभरातूनच नव्हे, तर संपूर्ण जगभरातून लोक तेथे जात आहेत.

New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री (15 फेबुवारी) एक मोठी दुर्घटना (New Delhi Railway Station Stampede) घडली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर झालेल्या चेंगराचेंगरीत 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. यासाठी देशभरातूनच नव्हे, तर संपूर्ण जगभरातून लोक तेथे जात आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री (15 फेबुवारी) नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अचानक रात्री 8.30-9 वाजताच्या दरम्यान प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले. यामुळे हा गोंधळ उडाला. यामुळे येथे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदर घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमींना अडीच लाख आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे.
#WATCH | Huge crowd witnessed outside the New Delhi Railway Station.
— ANI (@ANI) February 15, 2025
As per Ministry of Railway, the situation is under control, and the injured have been taken to the hospital pic.twitter.com/WB5Smv1LTW
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्विट-
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Distressed by the stampede at New Delhi Railway Station. My thoughts are with all those who have lost their loved ones. I pray that the injured have a speedy recovery. The authorities are assisting all those who have been affected by this stampede.
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2025
दिल्लीच्या कार्यवाहक मुख्यमंत्री आतिशी काय म्हणाल्या?
दिल्लीच्या कार्यवाहक मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. आम्ही एलएनजेपी रुग्णालयात पोहोचलो आणि घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटलो. अनेक लोक जखमीही झाले आहेत, ज्यांवर उपचार सुरू आहेत. आमचे दोन आमदार पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी रुग्णालयात उपस्थित आहेत, असं आतिशी म्हणाल्या.
महाकुंभ जा रहे श्रद्धालुओं की नई दिल्ली रेलवे स्टेशन पर हुए हादसे में दर्दनाक मौत अत्यंत दुखद और हृदयविदारक है। LNJP अस्पताल पहुँचकर पीड़ित परिजनों से मुलाकात की। कई लोग घायल भी हैं, जिनका इलाज जारी है। पीड़ित परिवारों की मदद के लिए हमारे दो विधायक अस्पताल में ही मौजूद हैं।
— Atishi (@AtishiAAP) February 15, 2025
इस… pic.twitter.com/4vwsW0SLre
सदर घटनेत मृत झालेल्यांची नावे-
१. बक्सर बिहार येथील रहिवासी रविंदी नाथ यांच्या पत्नी आहा देवी, वय ७९ वर्षे
२. पिंकी देवी, उपेंद्र शर्मा यांच्या पत्नी, संगम विहार दिल्ली येथील रहिवासी, वय ४१ वर्षे
३. सरिता विहार दिल्ली येथील रहिवासी उमेश गिरी यांच्या पत्नी शीला देवी, वय ५० वर्षे
४. व्योम, धर्मवीरचा मुलगा, बवाना दिल्ली येथील रहिवासी, वय २५ वर्षे
५. पूनम देवी, मेघनाथ यांच्या पत्नी, रहिवासी, सारण बिहार, वय ४० वर्षे
६. ललिता देवी, संतोष यांच्या पत्नी, रहिवासी, पराणा बिहार, वय ३५ वर्षे
७. सुरुची, मनोज शाह यांची मुलगी, मुजफ्फरपूर, बिहार, वय ११ वर्षे.
८. कृष्णा देवी, समस्तीपूर बिहार येथील रहिवासी विजय शाह यांच्या पत्नी, वय ४० वर्षे
९. विजय साह, राम सरूप साह यांचा मुलगा, समस्तीपूर बिहारचा रहिवासी, वय १५ वर्षे
१०. नीरज, इंद्रजित पासवान यांचा मुलगा, वैशाली बिहारचा रहिवासी, वय १२ वर्षे
११. शांती देवी, बिहारमधील नवादा येथील रहिवासी राज कुमार मांझी यांच्या पत्नी, वय ४० वर्षे.
१२. पूजा कुमार, राज कुमार मांझी यांची मुलगी, रहिवासी नवादा, बिहार, वय ८ वर्षे
१३. संगीता मलिक, मोहित मलिक यांच्या पत्नी, भिवानी हरियाणा येथील रहिवासी, वय ३४ वर्षे
१४. महावीर एन्क्लेव्ह येथील वीरेंद्र सिंग रहिवासी यांची पत्नी पूनम, वय ३४ वर्षे.
१५. ममता झा, विपिन झा, रहिवासी, नांगलोई, दिल्ली, वय ४० वर्षे.
१६. रिया सिंग, ओपिल सिंग यांची मुलगी, सागरपूर, दिल्ली, वय ७ वर्षे
१७. बेबी कुमारी, प्रभू शाह यांची मुलगी, बिजवासन, दिल्ली येथील रहिवासी, वय २४ वर्षे.
१८. मनोज मुलगा पंचदेव कुशवाह, रहिवासी नांगलोई दिल्ली, वय ४७ वर्षे
संबंधित बातमी:
दिल्ली स्टेशनवरून प्रयागराजला जाणारी पकडण्यासाठी उसळली गर्दी, VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
