एक्स्प्लोर

National Farmers Day | शेतकरी आंदोलनाच्या धामधुमीत 'शेतकरी दिवस'

नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील 28 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकरी आंदोलनाच्या धामधुमीतच आज राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा होत आहे. जाणून घेऊया शेतकरी दिनाविषयी सर्वकाही

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील 28 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज संपूर्ण देश राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करत असताना भारतीय किसान युनियनने आज एकवेळ न जेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटनांनी जनतेला आवाहन केलं आहे की त्यांनी आज दुपारचं जेवण बनवू नये आणि त्याद्वारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा. देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी भारतात 'शेतकरी दिवस' साजरा केला जातो. शेतकऱ्यांचे नेते म्हणून लोकप्रिय असेलल्या चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने 2001 पासून चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत बुलंद करणारे शेतकरी नेते भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी चौधरी चरण सिंह यांनी अनेक कामं केली गोती. देशाच्या संसदेत शेतकऱ्यांसाठी चौधरी चरण सिंह आवाज बुलंद केला होता. चौधरी चरण सिंह हे 28 जुलै 1979 पासून 14 जानेवारी 1980 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. चौधरी चरण सिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव चौधरी मीर सिंह होतं. चौधरी चरण सिंह लहान असतानाच त्यांचं कुटुंब जानी परिसरात स्थायिक झालं. त्यांनी आग्रा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं होतं. यानंतर गाझियाबादमध्ये काही काळ वकिली केली होती. महात्मा गांधींजींचा त्यांच्यावर प्रभाव होता. National Farmers Day | शेतकरी आंदोलनाच्या धामधुमीत 'शेतकरी दिवस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते चौधरी चरण सिंह त्यांनी गाझियाबादमध्ये काँग्रेस समिती स्थापन केली होती. गांधीजींनी मीठासाठी केलेल्या दांडी यात्रा काढली होती तेव्हा चरण सिंह यांनीही हिंडनमध्ये मीठाचा कायदा मोडला होता. यासाठी सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा देशसेवेच्या कामात सक्रिय झाले. चौधरी चरण सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. यादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची कामं केली. त्यांच्यामुळेच आज शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्यांनी जमीनदारी रद्द केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी लेखापद पद बनवलं. त्यानंतर ते उपपंतप्रधान बनले आणि मग पंतप्रधानपदी विराजमान होऊन देशाची सेवा केली. यंदाचा शेतकरी दिवस वेगळा यंदा शेतकरी आंदोलनातच 'राष्ट्रीय शेतकरी दिवस' साजरा करणार आहेत. नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटना पुढील बातचीतसाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावावर आज निर्णय घेणार आहेत. आज सकाळी सिंघु बॉर्डरवर पुन्हा एकदा बैठक होईल. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकही होईल. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget