एक्स्प्लोर

Morning Headlines 12th April : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Dhairyasheel Mohite Patil: मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडली; पद आणि सदस्यात्वाचा राजीनामा, माढ्यात घडामोडींना वेग

Madha Lok Sabha Election 2024 : सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेईना. भाजपनं (BJP) रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh Naik Nimbalkar) उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyasheel Mohite Patil) भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यातून उमेदवारीसाठी निश्चित असलेले भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील वेगळी चूल मांडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तसेच, दरम्यानच्या काळात मोहिते पाटल आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) गाठीभेटीचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील भाजपची साथ सोडून लवकरच थोरल्या पवारांची तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता मोहिते पाटलांनी भाजपच्या पक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे आता ते शरद पवार गटात प्रवेश करणार आणि म्हाढ्यातून निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. वाचा सविस्तर 

कोकणात कदम बंधूचा वाद आणखी पेटणार!'माध्यमांसमोर मी सांगणार' पत्रक काढत सदानंद कदमांचा मोठ्या भावाला इशारा

 रत्नागिरी : सुड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये' अशा आशयाचे बॅनर रत्नागिरी (Ratnagiri News)  जिल्ह्यातील खेडमध्ये (Khed) काही दिवसांपूर्वी लागले होते. त्यामुळे रामदास कदम (Ramdas Kadam)  आणि त्यांचे बंधु सदानंद कदम (Sadanant Kadam) यांच्यातील वादाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता सदानंद कदम यांनी पत्रक काढत 'माध्यमांसमोर मी सांगणार' अशा थेट इशाराच रामदास कदम यांना दिला आहे. येत्या आठ दिवसामध्ये सदानंद कदम याबाबतची पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत कदम नेमकं काय बोलतात? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. वाचा सविस्तर 

Parbhani Lok Sabha: कोण, कुठला साताऱ्याचा उमेदवार, जो मायबापांनाच 5 वर्ष भेटत नाही, तो मतदारांना काय भेटणार? संजय जाधवांची पुन्हा जानकरांवर सडकून टीका

Sanjay Jadhav vs Mahadev Jankar : परभणी : परभणी (Parbhani News) जिल्ह्यात तिन्ही पक्षात एकही उमेदवार नव्हता का? साताऱ्याहून (Satara News) याला इथं आणलं, हे मायबापांनाच 5-5 वर्ष भेटत नाही तर मतदारांना काय भेटणार, अशी टीका महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्यावर परभणीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी केली आहे. याशिवाय भाजपला (BJP) जाती जातीत, धर्मात, माणसा माणसात भांडण लावून आपली पोळी भाजून घायची आहे, अशी सणसणीत टीका परभणीच्या जिंतूरमध्ये (Jintur News) केली आहे. वाचा सविस्तर 

Karan Pawar: भाजप का सोडली? महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी सांगितले कारण, म्हणाले भाजपात सत्य वेगळं...

जळगाव:  सत्य वेगळं असतं आणि बाहेर वेगळं दाखवलं जात असल्याचा अनुभव भाजपात आला. त्यामुळेच आपण भाजप (BJP)  सोडून ठाकरे गटात सहभागी झालो, असं जळगाव लोकसभा मतदारसंघाचे (Jalgaon Lok Sabha)  महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi)  उमेदवार करण पवार यांनी म्हटलं. काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना उमेदवार करण पवार यांनी भाजपावर टीका केली. वाचा सविस्तर 

RBI Ban Bank : रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्रातील मोठ्या बँकेवर बंदी; ग्राहकांना पैसे काढण्यासही निर्बंध

RBI Ban Bank From Maharashtra : नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) महाराष्ट्रातील सहकारी बँकेतून पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. ज्यामुळे या बँकेशी संबंधित ग्राहक पुढच्या सहा महिन्यांपर्यंत पैसे काढू शकणार नाहीत. याशिवाय बँकेला कोणत्याही ग्राहकाला कर्ज किंवा इतर रक्कम देण्यास परवानगी देखील नाकारण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेनं उचललेल्या या पावलामुळे सहकारी बँकांचे हजारो ठेवीदार बँकेतून ठेवी काढू शकत नसल्यानं चिंतेत आहेत. बँकेचे ठेवीदार आणि ग्राहक मोठ्या कोंडीत सापडले आहेत. वाचा सविस्तर 

Horoscope Today 12 April 2024 : शुक्रवार ठरणार फलदायी! आज 'या' राशींकडे धावून येणार प्रगतीच्या संधी; वाचा तुमचे राशीभविष्य

Horoscope Today 12 April 2024 : पंचांगानुसार, आज 12 एप्रिल 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. चैत्र महिन्याचा चौथा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवारचा दिवस  कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Budget 2025 | Mahayuti PC | एकनाथ शिंदेंकडून पुन्हा खुर्ची चर्चेत, शिंदेंच्या मनातून जाईना- अजित पवारBudget Superfast | अर्थ बजेटचा | अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटमधून  सर्वसामान्य जनतेसाठी नेमकं काय?Sandeep Kshirsagar News | ज्यांनी मारहाण केली ती माझी माणसं नाहीत, संदीप क्षीरसागर यांचं स्पष्टीकरणABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Embed widget