Horoscope Today 12 April 2024 : शुक्रवार ठरणार फलदायी! आज 'या' राशींकडे धावून येणार प्रगतीच्या संधी; वाचा तुमचे राशीभविष्य
Horoscope Today 12 April 2024 : चैत्र महिन्याचा चौथा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो.
Horoscope Today 12 April 2024 : पंचांगानुसार, आज 12 एप्रिल 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. चैत्र महिन्याचा चौथा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवारचा दिवस कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
लांबच्या प्रवासाचे योग येतील. घरात मंगल कार्य ठरेल. संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी पथ्य पाणी सांभाळावे. तरुणांनी परिस्थितीचे निरीक्षण करा त्यावर विचार करा आणि मग पावले उचला.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
नोकरी धंद्यामध्ये एखादे काम बरेच दिवस अडलेले असेल तर ते मार्गी लागेल. त्या संदर्भातील नवीन विचार डोक्यात घोळतील. घरामध्ये तरुण वर्गाची येजा जास्त राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
घरात काही सुधारणा कराल. बागकामाची आवड असणाऱ्यांना हा आजचा दिवस पर्वणी ठरेल. शत्रूंचे तुमच्यासमोर काही चालणार नाही.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
प्रेमी युगुलांनी आपले प्रस्ताव कुटुंबीयांसमोर मांडण्यास हरकत नाही. आपल्या बोलण्याने समोरच्याची मने जिंकाल. महिलांनी समजूतीचे धोरण स्वीकारावे.
सिंह रास (Leo Horoscope Today)
विद्यार्थी ज्या ज्ञान शाखेचा अभ्यास करीत असतील त्यामध्ये प्रगती होईल. समोरच्या माणसाच्या मनात काय चालले आहे हे तुम्हाला पटकन समजेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
तुमचा सकारात्मक दृष्टिकोन केवळ तुमच्यासाठीच नव्हे तर आजूबाजूला असलेल्या सर्वांसाठीच प्रगती कारक ठरेल. विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये जेवढी पात्रता आहे ती पणाला लावून अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करावी.
तूळ रास (Scorpio Horoscope Today)
तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. तुमच्या बौद्धिक व्यक्तिमत्वाला चेतना मिळेल. तुमच्या महत्वाकांशी स्वभावाला साजेसे काम मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
आर्थिक घडी चांगली बसेल. समाजात तुमच्या नेतृत्वाला पुढारीपणाला लोक पूर्ण दाद देतील. महिलांना स्वतःच्या आवडीनिवडी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत भासेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
वैवाहिक सौख्यामध्ये जोडीदाराशी तडजोड करावी लागेल. तसेच रागावरीही नियंत्रण ठेवावे लागेल. आज कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये.
मकर रास (Pisces Horoscope Today)
मनात येणाऱ्या नकारात्मक गोष्टींना आवर घालावा लागेल. नोकरी धंद्यामध्ये विक्षिप्त धोरण ठेवल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Pisces Horoscope Today)
वाहने जपून चालवा. यंत्राशी निगडित काम असणाऱ्यांनी लक्ष देऊन काम करावे. भावंडांशी मतभेद संभवतात. महिलांनी घरातील काम करताना आरोग्याच्या दृष्टीने स्वतःला सांभाळावे.
मीन रास (Pisces Horoscope Today)
तुम्ही ठरवलेल्या गोष्टींसाठी कौटुंबिक विरोध सहन करावा लागेल. त्यामुळे कधी अति उत्साह तर कधी आळसात दिवस घालवाल. निग्रह केला तर त्यातूनही पार पडून जाल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा:
Shani Dev : 2038 पर्यंत 'या' राशींवर असणार शनिची साडेसाती; एकामागोमाग करावा लागणार संकटांचा सामना