VK Paul on Covid Vaccine : ऑगस्ट महिन्यात भारताला मिळणार चौथी कोरोना प्रतिबंधक लस, ICMR च्या डॉ. व्ही. के. पॉल यांची माहिती
भारतात सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावापासून संरक्षणासाठी लसीचा मोठा आधार आहे. सध्या देशात तीन लसींना मान्यता मिळाली असून आता कोरोनाला रोखण्यासाठी आणखी एका लसीला परवानगी मिळणार आहे. Biological E या कंपनीची लस ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होणार असल्याची माहिती ICMR चे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या लढाईत लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसत आहे. भारतात सध्या तीन कंपन्यांच्या लसींना परवानगी असून आता ऑगस्ट महिन्यात भारताला चौथी कोरोनाची लस मिळण्याची शक्यता आहे. हैदराबादमधील बायोफार्मास्युटिकल Biological E या कंपनीतर्फे केल्या गेलेल्या मानवी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचण्यांचे पहिले दोन टप्पे पूर्ण झाले असून त्यासंबंधित माहिती लवकरच समोर येणार आहे. या दोन टप्प्यांच्या अहवालानंतर ही कंपनी लसीच्या तिसऱ्या टप्प्याकडे वाटचाल करेल.
“बायोलॉजिकल ईने फेज 1 आणि 2 च्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. ते पुढील काही दिवसात डेटा सुद्धा सबमिट करणार आहेत, त्यानंतर ते तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू करतील." अशी माहिती नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी दिली. बायोलॉजिकल ई ही कंपनी बालपणी घेतल्या जाणाऱ्या लस तयार करते. ही भारतातील टेटनस लस आणि सर्प विषाणूशी लढणाऱ्या लसींचं सर्वाधिक उत्पादन करते.
या लसीला ऑगस्टमहिन्यापर्यंत केंद्र सरकारकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, ऑगस्ट महिन्यातच ही वापरासाठी उपलब्ध होणार आहे. बायोलॉजिकल ई या कंपनीत महिन्याला सात कोटी लसी तयार करण्याची क्षमता आहे, त्यामुळे ही लस वापरात येणं अतिशय सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण बाब असणार आहे, असं पॉल यांनी म्हटलंय. आयसीएमआरच्या माहितीनुसार बायोलॉजिकल ई दोन डोस असणाऱ्य़ा लसीची चाचणी करत आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनप्रमाणेच बायोलॉजिकल ई ची लस 28 दिवसांच्या अंतराने दिली जाणार आहे.
या लसीला मंजुरी मिळाल्यास बायोलॉजिकल ई ही लस ही देशात वापरली जाणारी चौथी लस ठरणार आहे. आपत्कालीन वापरासाठी भारताने सध्या तीन लसींना परवानगी दिली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड, अॅस्ट्राझेनेका NSE या तीन लसी भारताच्या लसीकरण मोहिमेत वापरल्या जात आहेत. रशियन लस स्फुटनिक व्ही या लसीलादेखील भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये स्फुटनिक व्ही या लसीची निर्मिती सध्या होत आहे.
महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात अनेक ठिकाणी लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो, अनेक ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने अनेकांना माघारी फिरावं लागतंय. सीरमची लस पुण्यामध्ये तयार होत असूनही 24 मेपर्यंत ती महाराष्ट्रात उपलब्धच होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. 1 मेपासून देशभरात अठरा वर्षांवरील सर्वांनाच लस घेण्याची परवानगी असणार आहे त्यामुळे लसीचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. मात्र लसीकरण मोहिमेत आता आणखी काही लसींना समाविष्ट करण्यात आल्याने आता लवकरच मोठ्या प्रमाणात भारतीय लस घेऊ शकणार आहेत आणि लसींचा तुटवडा भासणार नाही.
लसीकरणाशी संबंधित बातम्या
18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकारचा मेगाप्लॅन, कसा असेल आराखडा?
भारत सरकारच्या कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी Pfizer ची 'ना नफा' तत्वावर लस पुरवण्याची ऑफर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
