पुण्यात तयार होत असूनही सीरमची लस महाराष्ट्राला 24 मेपर्यंत मिळणार नाही, परदेशी लसींबाबत चाचपणी सुरू
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्यात एक ऑनलाईन बैठक पार पडली. त्यामध्ये राज्यातील 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण कशा पद्धतीने करण्यात येऊ शकेल यावर चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील या व्यापक लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये जवळपास 8.5 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील लसीकरणाचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकार आता परदेशातून कोरोनाच्या लसी आयात करणार आहे. तसेच ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांचा फंड आता कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.























