एक्स्प्लोर
Advertisement
सेक्स स्कँडल: त्या सीडीत दिसणारा मी नाही : संदीप कुमार
नवी दिल्ली : दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारमधून सेक्स स्कँडलमुळे हकालपट्टी झालेले माजी मंत्री संदीप कुमार यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.
"मी दलित असल्यामुळे हे माझ्याविरोधात षडयंत्र आहे" असा दावा संदीप कुमार यांनी केला आहे. कोणत्याही पडताळणीशिवाय व्हिडीओच्या सत्यतेबाबत कसा काय अंदाज लावू शकता, असा सवाल संदीप कुमार यांनी केला आहे.
"हे माझ्याविरोधात षडयंत्र आहे. याची चौकशी होणं आवश्यक आहे. माध्यमातून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. त्या सीडीमध्ये दिसणारा व्यक्ती मी नाही. माझं वजन 150 किलो आहे, पण सीडीत दिसणारी व्यक्ती अत्यंत किरकोळ दिसते", असा दावा संदीप कुमार यांनी केला आहे.
एबीपी न्यूजने एका सीडीव्दारे संदीप कुमार यांच्या सेस्क स्कँडलचा पर्दाफाश केला. संदीप कुमार यांच्या कारनामा कालच जगासमोर आल्यानंतर, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.
संदीप कुमार यांच्याकडे महिला आणि बालविकासमंत्रीपद होतं.
काय आहे प्रकरण?
एबीपी न्यूजने एका सीडीव्दारे संदीप कुमार यांच्या यांच्या सेस्क स्कँडलचा काल पर्दाफाश केला. या व्हिडिओमध्ये मंत्री संदीप कुमार दोन महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. हे वृत्त एबीपी न्यूजने दाखवल्यानंत तातडीनं संदीप कुमार यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी केल्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरुन केली.
महिला आणि बालविकास मंत्री अशा प्रकारे महिलेसोबत अश्लील वर्तन करत असल्याचं आढळल्यानं विरोधकांनी आपवर जोरदार टीका केली आहे.
'त्या' सीडीत काय होतं?
आक्षेपार्ह सीडीमध्ये दिसणारा व्यक्ती हा दिल्लीचा माजी मंत्री संदीप कुमार असल्याचा दावा करण्यात आला आहे. संदीप कुमार दिसत असलेल्या या सीडीतील व्हिडीओ 9 मिनिटांचा आहे. काही सेकंदानंतर या व्हिडीओत संदीप कुमार दिसतात.
महिलेची एण्ट्री
एका बेडवर संदीप कुमार आक्षेपार्ह स्थितीत दिसतात. त्यानंतर तिथे त्यांच्या वयापेक्षा मोठी महिलेची एण्ट्री होते. त्यानंतरचा व्हिडीओ अत्यंत आक्षेपार्ह आहे. या व्हिडीओशिवाय दुसऱ्या एका महिलेसोबतचे आक्षेपार्ह फोटो या सीडीत दिसतात. दरम्यान या सीडीच्या सत्यतेची पुष्टी 'एबीपी'ने केलेली नाही.
विरोधकांचा केजरीवालांना घेराव
केजरीवाल यांचा मंत्री थेट सेस्क स्कँडलमध्ये अडकल्याने विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. ही सीडी ज्याने समोर आणली, त्यांच्या दाव्यानुसार मुख्यमंत्री केजरीवालांना 15-20 दिवसांपूर्वीच या सीडीबाबत सांगण्यात आलं होतं. मात्र त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. पण 'आप'ने हा दावा फेटाळला आहे. केजरीवालांना कालच या सीडीबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी अर्ध्या तासात संदीप कुमार यांची हकालपट्टी केली.
संबंधित बातम्या
सेक्स स्कँडल प्रकरणी दिल्लीचे मंत्री संदीप कुमार यांची हकालपट्टी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
क्राईम
राजकारण
Advertisement