राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Facebook

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे.

Image Source: Facebook

संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती.

Image Source: Facebook

मागील दहा वर्षात महाराष्ट्र सरकारमधील चार मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

Image Source: Facebook

एकनाथ खडसे

एकनाथ खडसे हे महाराष्ट्र राज्याचे महसूल, कृषी, राज्य उत्पादनशुल्क मंत्री होते. 2016 मद्धे एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते.

Image Source: Facebook

संजय राठोड

एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून मंत्री संजय राठोड यांनी वर्षा निवासस्थानी भेट घेत उध्दव ठाकरेंकडे राजीनामा दिला होता.

Image Source: Facebook

अनिल देशमुख

मनी लाँड्रिंग, परमबीर सिंग आणि इतर अनेक आरोपांमुळे अनिल देशमुखांनी 2021 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे सोपवला होता.

Image Source: Facebook

धनंजय मुंडे

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या प्रकरणावरून सोमवारी रात्री व्हायरल झालेल्या फोटोवरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे याच्यात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला होता.

Image Source: Facebook