एक्स्प्लोर
Advertisement
कधीही न भेटलेल्या कुटुंबाला दर महिन्याचा अर्धा पगार दान
लुटारुंच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या एका ट्रकचालकाच्या कुटुंबाला आयपीएस अधिकारी अस्लम खान दर महिन्याला मदत करतात.
नवी दिल्ली : एकीकडे पैशांसाठी आपल्या माणसांचा जीव घेणाऱ्यांची उदाहरणं पाहायला मिळतात, तर दुसरीकडे ज्या कुटुंबाची भेटही झाली नाही, त्यांच्यासाठी दर महिन्याचा अर्धा पगार देणाऱ्या आयपीएस ऑफिसरची कहाणी प्रेरणादायी ठरते. लुटारुंच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या एका ट्रकचालकाच्या कुटुंबाला आयपीएस अधिकारी अस्लम खान दर महिन्याला मदत करतात.
दिल्लीत राहणारे ट्रकचालक सरदार मान सिंग यांनी मेहनतीने 80 हजार रुपये कमावले होते. भाच्याच्या लग्नासाठी त्यांनी ही रक्कम जमा केली होती.
सरदार मान सिंग बऱ्याच महिन्यांनी पत्नी आणि तीन मुलांना भेटण्यासाठी घरी चालले होते. त्या रात्री सरदार मान सिंग रस्ता चुकले. रस्ता विचारण्यासाठी ते ट्रकमधून खाली उतरले आणि दोघा लुटारुंनी त्यांची वाट अडवली. सरदार मान सिंग यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे लुटारुंनी त्यांच्यावर हल्ला केला आणि पळून गेले.
जखमी अवस्थेत सिंग बराच काळ हायवेवर पडून होते. कोणतीही मदत न मिळाल्यामुळे रक्तस्रावामुळे सरदार मान सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या रात्री त्यांची मुलं बलजीत कौर, जसमित कौर, अस्मित कौर, पत्नी दर्शन कौर आणि आई शांत झोपल्या होत्या. आपल्यासोबत नियतीने केलेल्या क्रूर खेळाची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती.
'दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. शाळेच्या फीचाही पत्ता नव्हता. अचानक दिल्लीहून फोन आला. आमची जगण्याची धडपड डीसीपी मॅडम (आयपीएस अधिकारी अस्लम खान) यांना समजली. त्यांनी दर महिन्याला आम्हाला थोडी रक्कम देण्याचं वचन दिलं. इतकंच नाही, तर सरकारकडून मदत मिळवून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.' असं सरदार मान सिंग यांच्या मुलांनी सांगितलं.
आयपीएस अधिकारी अस्लम खान दर महिन्याचा अर्धा पगार मान सिंग यांच्या कुटुंबाला पाठवतात. विशेष म्हणजे दोघांची अद्याप एकदाही भेट झालेली नाही. मात्र खान दररोज फोन करुन त्यांची आस्थेने चौकशी करतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement