'स्पा'साठी जस्ट डायलला केला मेसेज, मिळाली 150 कॉलगर्ल्सची रेट लिस्ट; महिला आयोगाची 'जस्ट डायल'ला नोटिस
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल (Swati Maliwal) यांनी दिल्ली पोलीस आणि जस्ट डायलला (Justdial) नोटिस पाठवली आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियाचा जसा चांगल्या कामासाठी वापर होतो तसाच वाईट कामांसाठी आणि काळ्या धंद्यांसाठीही वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर येत आहे. याचा अनुभव प्रत्यक्ष दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांना आला आहे. स्वाती मालिवाल (Swati Maliwal) यांनी जस्ट डायलवरुन (Justdial) स्पा मसाज (Spa Massage) केंद्राची माहिती मागितली असता त्यांना 150 कॉलगर्ल्सची रेट लिस्ट देण्यात आली. या प्रकरणावरुन त्यांनी जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांनी नोटिस पाठवली आहे.
या घटनेची माहिती स्वत: स्वाती मालिवाल यांनी दिली आहे. स्वाती मालिवाल यांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "आम्ही जस्ट डायलवर स्पा मसाजसाठी एक फेक एन्क्वायरी केली तर आम्हाला फोनवर जवळपास 50 मेसेज आले. त्यामध्ये 150 पेक्षा जास्त कॉलगर्ल्सची रेट लिस्टची माहिती होती. जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांना यावर समन्स जारी करण्यात येत आहे. या काळ्या धंद्याला प्रोत्साहन देण्यामध्ये जस्ट डायलची भूमिका काय आहे?"
हमने Justdial पर कॉल कर स्पा मसाज के लिए फेक इंक्वाइरी की तो हमारे फोन पर 50 ऐसे मेसेज आ गए जिसमें 150 से ज़्यादा लड़कियों के ‘रेट’ बताए गए। जस्ट डायल और दिल्ली पुलिस क्राइम ब्रांच को को समन जारी कर रही हूं, इस धंधे को बढ़ावा देने में Just Dial का क्या रोल है? pic.twitter.com/zGEHHjKEXJ
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) November 8, 2021
जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांना समन्स
या प्रकरणात दिल्ली महिला आयोगाकडून दिल्ली पोलीस आणि जस्ट डायलला समन्स देण्यात आलं आहे. या प्रकरणी जे दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी अवैध धंदे केले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या :