बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरीचा अंतिम Opinion Poll, एका क्लिकवर पहा कुठे कोणाचे सरकार यईल?
ABP News-CVoter Opinion Poll Results 2021: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी एबीपी न्यूजने ओपिनियन पोल केले आहे. पाच राज्यांचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या अगदी आधी या राज्यांतील जनतेकडून मत घेतले गेले होते. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान होईल. आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीमध्ये 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
ABP Opinion Poll Results 2021: कोरोना महामारी काळात वर्ष 2021 आपला सर्वात मोठा राजकीय निर्णय देण्यास सज्ज आहे. मार्च-एप्रिलमध्ये देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत, अशात ही वर्षातील सर्वात मोठी राजकीय घटना म्हणून नोंदविली जाईल. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, पुडुचेरी आणि केरळमधील लोक आपापल्या राज्यांचे राजकीय भवितव्य ठरवतील. या निवडणुकीच्या हंगामात एबीपी न्यूजने पाच राज्यांतील अंतिम आणि अचूक ओपिनियन पोल केले आहेत. या सर्वेक्षणात 47 हजार 334 लोकांचे मत घेण्यात आले असून त्याचे आकडेवारीत रूपांतर करण्यात आले आहे.
राज्यनिहाय आकडेवारी
पश्चिम बंगाल- 292
टीएमसी- 152 ते 168 जागा
बीजेपी- 104 ते 120 जागा
काँग्रेस+लेफ्ट- 18 ते 26 जागा
अन्य- 0 ते दोन जागा
मतांची टक्केवारी
टीएमसी - 42.1 टक्के
भाजप - 37.4 टक्के
काँग्रेस+लेफ्ट+आयएसएफ- 13.0 टक्के
अन्य- 7.5 टक्के
सर्वेक्षणातील आकडेवारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा टीएमसीचे सरकार स्थापना होऊ शकते. मात्र, मागील विधानसभेच्या तुलनेत त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपला अजून वाट पाहावी लागणार आहे. पण, त्यांच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
आसाम - 126
एनडीए - 65 ते 73 जागा
यूपीए - 52 ते 60 जागा
अन्य - 0 ते 4 जागा
मतांची टक्केवारी
एनडीए- 45.0 टक्के
यूपीए- 41.1 टक्के
अन्य- 13.9 टक्के
सर्व्हेच्या आकडेवारीनुसार आसाममध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होऊ शकते. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 63 आहे. एनडीएला 65 ते 73 जागा मिळू शकतात. त्याचवेळी काँग्रेसप्रणित यूपीएला 52 ते 60 जागा मिळतील असा अंदाज आहे.
केरळ - 140
एलडीएफ- 71 ते 83 जागा
यूडीएफ - 56 ते 68 जागा
भाजप - 0 ते दोन जागा
अन्य - 0 जागा
मतांची टक्केवारी
एलडीएफ - 42.4 टक्के
यूडीएफ - 38.6 टक्के
बीजेपी - 16.4 टक्के
अन्य - 2.6 टक्के
केरळमध्ये पुन्हा एकदा एलडीएफ सरकार स्थापन होत आहे. एलडीएफला 71 ते 83 जागा मिळतील असा अंदाज आहे. अशा प्रकारे राज्यात पुन्हा एकदा एलडीएफ सरकार स्थापन होऊ शकेल. तर 56 ते 68 जागा यूडीएफच्या खात्यात जातील अशा अंदाज आहे. भाजपला इथे 0 ते 2 जागा मिळू शकतात.
पुदुचेरी - 30
यूपीए (काँग्रेस-डीएमके)- 7 ते 11
एनडीए (आयएनआरसी+भाजप+एआयएडीएमके) - 19 ते 23
अन्य- 0 ते 1
मतांची टक्केवारी
यूपीए- 39.5 टक्के
एनडीए- 47.2 टक्के
अन्य- 13.3 टक्के
फेब्रुवारीमध्ये पुदुचेरीमधील काँग्रेसचे सरकार कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पडले. सर्व्हेक्षणातील आकडेवारी काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे, सत्ता त्यांच्यापासून दूर जाताना दिसत आहे. एनडीएला 19 ते 23 जागा मिळू शकतात आणि राज्यात त्यांचे सरकार स्थापन होऊ शकते. काँग्रेसप्रणित यूपीएला 7 ते 11 जागा मिळणे अपेक्षित आहे.
तमिळनाडु - 234
यूपीए (डीएमके+काँग्रेस+अन्य) - 173 ते 181
एनडीए (एआयएडीएमके+भाजप+अन्य)- 45 ते 53
एमएनएम - 1 ते 5
एएमएमके - 1 ते 5
अन्य - 0 ते चार
मतांची टक्केवारी
यूपीए - 46.0 टक्के
एनडीए- 34.6 टक्के
एमएनएम- 4.4 टक्के
एएमएमके- 3.6 टक्के
अन्य- 11.4 टक्के
यावेळी तमिळनाडूमध्ये काँग्रेस आणि एमके स्टालिन यांच्या युतीचं यूपीए सरकार येण्याच शक्यता आहे. यूपीएला येथे 173 ते 181 जागा मिळण्याचा अंदाज आहे. ही आकडेवारी मोठ्या विजयाकडे लक्ष वेधत आहे. त्याचवेळी दिवंगत जे जयललिता यांचा पक्ष आणि भाजप युतीला 45 ते 53 जागा मिळू शकतात.
(टीप-एपीपी न्यूजने सी वोटरच्या सहाय्याने पाच राज्यांमध्ये सर्व्हेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात 47 हजार 334 लोकांचे मत घेण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील 17 हजार 890 लोक यात सामील आहेत. यासह 17 ते 22 मार्च दरम्यान पश्चिम बंगालमध्ये स्नॅप पोलदेखील केले गेले आहे. त्यामध्ये 2 हजार 290 लोकांचा सल्ला घेण्यात आला आहे. यात एरर प्लस मायनस 3 टक्के आहे.)