Hinjawadi Fire Accident News: हिंजवडी जळीत कांडात ट्विस्ट, चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली; पोलीस तपासात संतापजनक कारण समोर
Pune News : पुण्यातील आयटी हब हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सच्या जळीत कांडाने धक्कादायक वळण घेतलंय. तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं तपासात उघड झालंय.

Pune News : पुण्यातील आयटी हब हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सच्या जळीत कांडाने धक्कादायक वळण घेतलंय. तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं आणि हे कृत्य चालकानेच केल्याचं तपासात उघड झालंय. मात्र ज्यांना जीवे मारायचं होते, ते यातून बचावले अन् निष्पाप चौघांचा यात बळी गेलाय. दिवाळी बोनससह पगार थकवला अन् चालक असून मजुरांची कामं सांगितली जात होती, म्हणून चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलंय.
दरम्यान, हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला आणि वायरिंग या ठिकाणी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी सुरुवातीला व्यक्त केला होता. मात्र आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
चालकाला छळलं, त्याने चक्क वाहानचं पेटवलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी आणि टेम्पो ट्रॅव्हल्सचा चालक जनार्दन हंबर्डीकरने याचे कंपनीतील अनेकांसोबत वाद होता. त्यात पगार थकवनं, खालच्या दर्जाची कामं सांगणं, उचित वागणून न देणं, असे वेगवेगळी अनेक कारणं पुढे आली आहे. शिवाय चालक असून त्याला कामगाराचे काम सांगितले जात होतं. या एकंदरीत प्रकरणाला कंटाळून आणि रागातून त्याने हे कृत्य केल्याचे आता समोर आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनेच्या आधल्यादिवशीच हा कट रचल्याचे समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोतून सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कामासाठी जात होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. व्योमा प्रिंटिंग प्रेसची बस तमन्ना सर्कलवरून रेजवानच्या दिशेने जात होती. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे.
पुढे बसलेल्यांनी तत्काळ खाली उडी मारली आणि ते थोडक्यात वाचले. मागच्या बाजूस बसलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो लॉक झाल्याने चार कर्मचारी आगीत होरपळले. ते चौघेही इंजिनिअर होते अशी माहिती समोर येत आहे. जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. मात्र आता या प्रकरणाच्या तपासात ही घटना अपघात नसून घातपात असल्याचे तपासात पुढे आले आहे.
हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्सच्या आग - मृतक आणि जखमींची नावं
-सुभाष भोसले, वय 42
-शंकर शिंदे, वय 60
-गुरुदास लोकरे, वय 40
-राजू चव्हाण, वय 40,
सर्व राहणार पुणे
जखमी झालेल्यांची नावे
-प्रदीप राऊत
-प्रवीण निकम
-चंद्रकांत मलजीत
-संदीप शिंदे
-विश्वनाथ झोरी
-जनार्दन हंबारिडकर - टेम्पो चालक
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

