चिखली हत्याकांडानं बुलढाणा हादरला; पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नी अन् मुलीची हत्या करून पतीनं घेतला गळफास
Buldhana Crime: घरगुती वादातून एका माथेफिरु पतीनं आपल्या पोलीस कर्मचारी पत्नीची आणि चार वर्षांच्या मुलीची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर आरोपीनं एका विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
Maharashtra Buldhana Crime News: बुलढाण्यातील (Buldhana Crime News) चिखली हत्याकांडानं (Chikhali Murder Case) संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. घरगुती वादातून एका माथेफिरु पतीनं आपल्या पोलीस कर्मचारी पत्नीची आणि चार वर्षांच्या मुलीची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर आरोपीनं एका विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं चिखलीसह (Chikhali News) संपूर्ण जिल्ह्यात खळबळ पसरली.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहर. एरव्ही गजबजलेलं हे शहर काल (सोमवारी) मात्र शांत होतं. काल पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असा दुहेरी योग होता. मात्र चिखलीमधील एका कुटुंबासाठी कालचा दिवस शेवटचा दिवस होता. नागपंचमी आणि श्रावणी सोमवार असल्यानं या परिसरात भाविकांची गर्दी होती. परंतु, दुपारी एक वाजेनंतर या परिसरातील एका घरात झालेल्या घटनेनं हा संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. काल बुलढाण्यातील चिखली शहरात घरगुती वादातून माथेफिरु पतीनं पोलीस कर्मचारी असलेल्या आपल्या पत्नीची आणि चार वर्षांच्या चिमुरडीची धारदार शस्त्रानं हत्या केली आणि स्वतःही चिखली शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर जाऊन एका विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे मात्र जिल्हाभर खळबळ उडाली आहे.
व्यवसायानं शेतकरी असलेल्या किशोर कुटे यानं आपली पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नी वर्षात दंडाळे आणि चार वर्षांची चिमुरडी कृष्णाई हिचा धारदार शस्त्रानं खून केला. त्यानंतर काही वेळातच चिखली शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एका विहिरीत दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार समोर येताच परिसरात खळबळ उडाली. तात्काळ चिखली शहर पोलीस या ठिकाणी पोहोचले. पण नेमकं काय घडलं? हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी ही घटनास्थळी पोहोचले, मात्र हा प्रकार का घडला? याची सखोल चौकशी आता चिखली पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :