अंबानी कुटुंबाने केले ईशाच्या मुलांचे ग्रँड वेलकम, ताफ्यात दिसली 12 कोटींची 'ही' आलिशान कार
Mukesh Ambani Car Collection: मुकेश (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी यांना त्यांच्या महागड्या गाड्यांमधून प्रवास करताना अनेकदा पाहिले गेले आहे. परंतु त्यांच्या बुलेटप्रूफ वाहनांसह ते पहिल्यांदाच दिसले आहेत.
Mukesh Ambani Car Collection: उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी त्यांची मुलगी ईशाच्या (Isha Ambani) जुळ्या बाळांचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले, जे नुकतेच अमेरिकेतून भारतात आले होते. मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलांसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, या भव्य सोहळ्यात सहभागी झालेल्या आलिशान गाड्याही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पुन्हा एकदा भारतातील हे अब्जाधीश कुटुंब (Ambani Family) त्यांच्या आलिशान कारच्या ताफ्यासह (Luxury Cars) दिसले आहेत.
मुकेश (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी यांना त्यांच्या महागड्या गाड्यांमधून प्रवास करताना अनेकदा पाहिले गेले आहे. परंतु त्यांच्या बुलेटप्रूफ वाहनांसह ते पहिल्यांदाच दिसले आहेत. मुलांचे स्वागत करण्यासाठी अंबानी कुटुंबाने पहिल्यांदाच फोटोंसाठी अँटिलाचे दार उघडले. अंबानी कुटुंब (Ambani Family) Antilla मध्ये Mercedes-Benz S600-Guard आणि Rolls Royce Cullinan सारख्या महागड्या लक्झरी वाहनांसह दिसले. चला जाणून घेऊया या गाड्यांमध्ये काय खास आहे.
12 कोटींची Mercedes ची ही कार
Mercedes-Benz S600 Guard ही Mercedes-Maybach S600 ची बुलेटप्रूफ व्हर्जन आहे. ही न्यू जनरेशन कार आहे. ज्यामध्ये या वर्षाच्या सुरुवातीला मुकेश अंबानी दिसले होते. या कारची किंमत 12 कोटींहून अधिक आहे. मर्सिडीज S600 गार्डची डिझाईन नेहमीच्या मर्सिडीज-बेंझ कारप्रमाणेच आहे. त्यामुळे ही बुलेटप्रुफ कार आहे हे ओळखणे कठीण होते. ही कार VR10-स्तरीय सुरक्षिततेसह येते. हे प्रमाणपत्र प्राप्त करणारे ही जगातील पहिली नागरी वाहन बनले आहे. ही कार थेट गोळ्यांचा सामना करू शकते आणि 2 मीटर अंतरावरून 15 किलो टीएनटी स्फोट सहन करण्यास सक्षम आहे. मर्सिडीज-बेंझ S600 re-enforced steel पासून बनवले आहे. याशिवाय कारमध्ये विशेष अंडरबॉडी आर्मर आणि पॉली कार्बोनेट कोटेड विंडो आहेत. Mercedes-Benz S600 Guard मध्ये 6.0-लिटर V12, ट्विन-टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन आहे. जे 523 Bhp पॉवर आणि 850 Nm टॉर्क जनरेट करते. यात 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे.
Rolls Royce Cullinan
अंबानी कुटुंबीयांच्या (Ambani Family) कारच्या (Car) ताफ्यात एक रोल्स रॉयस कुलीनन (Rolls Royce Cullinan) देखील दिसली आहे. रोल्स रॉयसच्या (Rolls Royce) या लक्झरी एसयूव्हीची किंमत 13.8 कोटी रुपये आहे. अंबानी कुटुंबाची (Ambani Family) ही तिसरी रोल्स रॉयस (Rolls Royce) कार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही कार बुलेटप्रूफही करण्यात आली आहे. मात्र, गोपनीयतेच्या दृष्टीने या कारची सेफ्टी फीचर्स (Rolls Royce Safety Features) गुप्त ठेवण्यात आली आहेत.