एक्स्प्लोर

Akola Crime News: जमिनीचा ताबा घ्यायला विरोध, अकोल्यात सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

Akola Crime News: अकोल्यात सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न, वयोवृद्ध वडिलांच्या पाठीत धारदार शस्त्राने वार, कपडे रक्ताने माखले. या सगळ्या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अकोला: अकोला जिल्ह्यात सध्या पोलिसांचा धाक उरला की नाहीय?, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक घटना घडतायेत. अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला वेशीवर टांगणारा एक व्हिडिओ सध्या 'सोशल मीडिया'वर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अकोला (Akola News) जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनब्दा गावातला आहेत. सावकाराला शेतीचा (Farmer) ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलाय. 17 मे रोजीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Savkar goons attack on Farmer)

मनब्दा गावातील गतमने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांच्यात शेतीच्या ताब्यावरुन वाद (Farm Land Dispute) सुरु आहेत. हा वाद सध्या न्यायालयात असताना शेळके यांनी शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय. या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या गतमने कुटुंबीयांवर सावकार शेळके आणि त्यांच्या गुंडांनी हल्ला चढवला. यात संदीप गतमने (Sandeep Gatmane) याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहेय. तर वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.  याप्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये सावकारखसह आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वयोवृद्ध शेतकऱ्याच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात

आपली जमीन वाचवण्यासाठी गतमाने कुटुंबीय जीव पणाला लावून गुंडांचा प्रतिकार करत होते. कोणत्याही परिस्थितीत ट्रॅक्टर पुढे सरकून द्यायचा नाही, या निर्धाराने ते पाय रोवून उभे राहिले होते. यावेळी सावकाराने पाठवलेल्या गुंडांनी संदीप गतमने यांना बेदम मारहाण केली. यावेळी त्यांचे वयोवृद्ध वडील हरिभाऊ गतमाने हेदेखील मागचा-पुढचा विचार न करता या भांडणात पडले. त्यावेळी एका गुंडाने त्यांच्या पाठीत धारदार शस्त्राने वार केला. त्यामुळे हरिभाऊ गतमाने यांच्या पाठीवर मोठी जखम झाली. या जखमेतून रक्त वाहत असल्याने हरिभाऊ गतमाने यांचे कपडे रक्ताने माखले होते. त्यांच्या दोन्ही हातांनाही दुखापत झाले आहे. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केली, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. 

आणखी वाचा

जमीन परत पाहिजे तर मुलगी आणि सुनेला पाठव, सावकाराची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
Donald Trump : फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
Latur : लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
Narayan Rane : मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 February 2025Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वासABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 02 February 2025Dhananjay Deshmukh Bhagwangad : धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
Donald Trump : फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
Latur : लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
Narayan Rane : मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
Praful Patel & Nana Patole : कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
INDIA Alliance : इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
Mumbai News : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
Embed widget