एक्स्प्लोर
Advertisement
सावकाराच्या मारहाणीने अपमानाची भावना, तरुणाची आत्महत्या
उस्मानाबाद : उस्मानाबादमधल्या मोहा गावात माणुसकीला लाजवणारी एक घटना उघडकीस आली आहे. सावकाराच्या मारहाणीमुळे अपमान झाल्याच्या भावनेतून 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
एक हजार रुपयांच्या कर्जाची 22 हजार रुपये देऊन परतफेड केल्यानंतरही सावकारानं सुनील मुटकुळेला अमानुष मारहाण केली. संपूर्ण गावादेखत तीन तास झालेल्या मारहाणीमुळे मानहानी झाल्याची भावना सुनीलच्या मनात बळावली. अखेर त्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ही घटना घडली.
21 वर्षाच्या सुनीलनं सावकार पप्पू मडकेकडून 1 हजार उसने घेतले होते. त्याची भरपाई म्हणून त्यानं अधिक 21 हजार रुपयांची परतफेड केली. त्यानंतरही पप्पू पैसे मागणं थांबत नव्हता. त्यामुळे सुनील दोन वर्ष गावातून बाहेर गेला.
रविवारी सुनील परतल्यानंतर पप्पू आणि त्याच्या दोन पुतण्यांनी भर चौकात लाठ्या-काठ्यांनी मारहाण करुन त्याला गटारीचं पाणी पाजलं. याप्रकणी सुनीलच्या कुटुंबानं तक्रार केल्यानंतर पप्पूसह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी अजूनही फरार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रीडा
राजकारण
Advertisement