Travel : चला..चला..अमरनाथ यात्रेला! घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाइन नोंदणी कशी कराल? सोप्या टिप्स फॉलो करा
Travel : अमरनाथ यात्रा 2024 साठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन नोंदणी करण्यासाठी, आपण खाली दिलेल्या या सोप्या टिप्स फॉलो करू शकता. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर नोंदणी केली जाईल.
Travel : हिंदू धर्मात चार धाम यात्रेला अत्यंत महत्त्व आहे. असं म्हणतात की ही यात्रा केल्याने पुण्य लाभते. 29 जूनपासून पवित्र अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) सुरुवात होत आहे. हिमालयाच्या सुंदर पर्वत रांगांमध्ये वसलेले अमरनाथ हे हिंदूंचे सर्वात आदरणीय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अमरनाथ यात्रा दरवर्षी जून-जुलै महिन्यात सुरू होते जी शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाची आहे. इथल्या गुहेतील बर्फापासून शिवलिंगाची निर्मिती हे अमरनाथचे वैशिष्ट्य आहे, नैसर्गिक बर्फापासून तयार होत असल्याने याला 'हिमानी शिवलिंग' किंवा 'बर्फानी बाबा' असेही म्हणतात.
नोंदणी प्रक्रियेत आव्हानांना तोंड द्यावं लागतंय
अमरनाथ यात्रा या वर्षी 29 जून म्हणजेच 2024 पासून सुरू होत असून ही यात्रा 52 दिवस चालणार असून ती 19 ऑगस्टला संपणार आहे. लाखो भाविक या पवित्र यात्रेत सहभागी होण्यास उत्सुक आहेत परंतु नोंदणी प्रक्रियेत काही आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. जर तुम्हीही यापैकी असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. अमरनाथ यात्रेसाठी घरी बसून मोबाईलवरून नोंदणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया येथे देण्यात आली आहे. वास्तविक, अमरनाथ यात्रेसाठी म्हणजेच बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी नोंदणी प्रक्रिया 15 एप्रिलपासून सुरू झाली आहे. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केली जाईल.
अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी...
सर्वप्रथम श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवर दिलेल्या 'Register' वर क्लिक करा.
पुढे जाण्यापूर्वी, सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
तुमचे नाव, फोन नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरा.
तुमचा वैध फोटो, ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करा.
नोंदणी फॉर्म सबमिट करा.
कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक टाका
ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज शुल्क जमा करा.
प्रवासासाठी परमिट डाउनलोड करा.
श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाचे मोबाईल ॲप कसे डाऊनलोड कराल?
श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाचे मोबाईल ॲप डाउनलोड करता येईल. त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
तुमच्या फोनमध्ये श्री अमरनाथजी श्राइन बोर्डचे ॲप डाउनलोड करा.
तुम्ही नवीन यूजर असल्यास, होमपेज स्किप करा
प्रवास सूचना वाचा आणि नंतर खाली दिलेल्या नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
प्रवास नोंदणीचे होमपेज उघडेल.
येथे मार्ग आणि प्रवासाची तारीख असा पर्याय दिसेल.
प्रवासाची तारीख निवडा आणि स्लॉट तपासा.
तुमची संपूर्ण माहिती भरा.
प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रही आवश्यक असेल.
अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी शुल्क किती आहे?
अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी शुल्क 150 रुपये प्रति व्यक्ती आहे.
वेबसाइटवर नमूद केलेल्या बँक शाखांद्वारे नोंदणी शुल्क भरता येईल.
अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
अधिकृत डॉक्टरांनी जारी केलेले वैध अनिवार्य आरोग्य प्रमाणपत्र (CHC),आधार कार्ड, 8 एप्रिल 2024 रोजी किंवा त्यानंतर सरकारने प्राप्त केलेले वैध ओळखपत्र.
अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करण्यासाठी वयोमर्यादा 13 ते 70 वर्षे आहे.
सहा आठवडे किंवा त्याहून अधिक गर्भवती असलेल्या महिलांना अमरनाथ यात्रेला जाण्याची परवानगी नाही.
अमरनाथ यात्रा 2024 साठी ऑफलाइन नोंदणी करण्यासाठी, तुम्ही या सोप्या टिप्सची मदत घेऊ शकता
जम्मू आणि काश्मीर बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा येस बँकेच्या कोणत्याही शाखेला भेट द्या.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करा
भरलेला अर्ज तयार ठेवा
आरोग्य प्रमाणपत्र अनिवार्य
अर्जदाराचे स्कॅन केलेले छायाचित्र
प्रति प्रवासी 500 रुपये नोंदणी शुल्क (पंजाब नॅशनल बँकेत जमा करायचे)
सहलीला जाणाऱ्या सर्व लोकांचे फोटो
प्रवास नोंदणी शुल्क (प्रति प्रवासी रु. 250)
ग्रुप लीडरचे नाव
मोबाईल क्रमांक
ईमेलसह पत्ता
अमरनाथ यात्रेसाठी वैद्यकीय फॉर्म कोणत्याही जवळच्या बँकेच्या शाखेतून मिळू शकतो.
फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरल्यानंतर स्वाक्षरी करावी लागेल.
त्यानंतर तुम्ही प्रवासासाठी योग्य आहात याची पडताळणी करण्यात येईल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : हिमाचल, उत्तराखंडही पडतील फिके! महाराष्ट्रातील 'हे' उत्कृष्ट हिल स्टेशन, निसर्गसौंदर्य पाहाल, तर मंत्रमुग्ध व्हाल..